आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धा : साथियन-हरमीतला जेतेपद

साथियन-हरमीत जोडीने लेबेसन-कॅसिन या फ्रेंच जोडीवर ११-९, ४-११, ११-९, ११-६ अशी मात केली. भारतीय जोडीने पहिल्या गेममध्ये निसटता विजय मिळवल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये निराशाजनक खेळ केला.

जी. साथियन आणि हरमीत देसाई या भारतीय जोडीने ट्युनिशिया येथे झालेल्या डब्ल्यूटीटी कंटेंडर ट्युनिस आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले. त्यांनी पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत इमॅन्युएल लेबेसन आणि अलेक्झांड्रे कॅसिन जोडीवर मात करत एकत्र खेळताना पहिल्या आंतरराष्ट्रीय जेतेपदावर नाव कोरले.

साथियन-हरमीत जोडीने लेबेसन-कॅसिन या फ्रेंच जोडीवर ११-९, ४-११, ११-९, ११-६ अशी मात केली. भारतीय जोडीने पहिल्या गेममध्ये निसटता विजय मिळवल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये निराशाजनक खेळ केला. मात्र त्यांना योग्य वेळी कामगिरीत सुधारणा करण्यात यश आले. त्यांनी तिसरा आणि चौथा असे सलग दोन गेम जिंकत सामन्यात बाजी मारली.

‘‘पुरुष दुहेरीत आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकण्याची ही माझी वैयक्तिक पहिलीच वेळ होती. तसेच हरमीतसोबत खेळतानाही आमचे हे पहिले जेतेपद ठरले. आम्ही दीर्घ कालावधीनंतर एकत्र खेळत आहोत. त्यामुळे सुरुवातीलाच सुवर्णपदक पटकावणे ही समाधानकारक बाब आहे,’’ असे साथियन म्हणाला. तसेच त्याने या यशाचे श्रेय त्याचा साथीदार हरमीतला दिले. साथियन-हरमीतने उपांत्य फेरीत पिछाडीवर पडल्यानंतरही हंगेरीच्या नॅन्दोर एसेकी आणि अ‍ॅडम झुडी जोडीला पराभूत केले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: International table tennis championship sathian harmeet wins akp

Next Story
रसिका , सारा , सुधांशु, आदित्य यांची विजयी सलामी
ताज्या बातम्या