दोन समान्यांमध्ये विश्रांती घेतल्यानंतर चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात पुन्हा मैदानात उतरला. या सामन्यामध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने दिल्लीवर ८० धावांनी मात करत गुणतालिकेत पुन्हा एकदा गुणतालिकेमध्ये पहिले स्थान मिळवले. धोनीने २२ चेंडूंमध्ये ४४ धावांची दमदार खेळी केली. मात्र या खेळीपेक्षा कालच्या समान्यातील धोनीने केलेले दोन स्टंपिंग चांगलेच चर्चेत आहेत. विशेष म्हणजे यापैकी पहिले स्टंपिंग धोनीने ०.१२ सेकंदात तर दुसरे अवघ्या ०.१६ सेकंदात केले.
१८० धावांचा पाठलाग करताना दिल्लीचा संघ सुरुवातीपासूनच गडगडताना दिसला. चेन्नईच्या फिरकीपटूंसमोर दिल्लीचे फलंदाज एकामागोमाग एक बाद होतं होते. चेन्नईचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा १२ व्या षटकात नुकातच मैदानात आलेल्या क्रिस मॉरिसला गोंलंदाजी करत होता. जडेजाने टाकलेला चेंडू खेळून काढण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या मॉरिसला तो चेंडू कळलाच नाही. चेंडू पडल्यानंतर बाहेर जात थेट धोनीच्या हातात विसावला. क्षणाचाही विलंब न लावता धोनीने स्टॅम्पवरील बेल्स उडवल्या. पंचांनीही लगेच तिसऱ्या पंचांकडे निर्णय देण्याची विनंती केली. अॅक्शन रिप्लेमध्ये चेंडू खेळताना क्रिझमध्येच असलेल्या मॉरिस तोल संभाळण्यासाठी थोडा पाय हवेत उचलताना दिसला आणि त्याच क्षणी धोनीने स्टम्पवरील बेल्स उडवल्या आणि अवघा काही इंच हवेत पाय असणाऱ्या मॉरिसला पंचांनी बाद घोषित केले.
चौथ्या चेंडूंवर मॉरिस बाद झाल्यानंतर याच षटकातील शेवटच्या चेंडूवरही काहीसा असाच प्रकार घडला. मात्र यावेळी बाद होणारा खेळाडू होता दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर. १२ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर श्रेयस बाद झाला तेव्हा संघाने केलेल्या ८५ धावांपैकी ४४ धावा एकट्या श्रेयसनेच केल्या होत्या. मात्र धोनीच्या चपळ क्षेत्ररक्षणामुळे तो बाद झाला.
या दोन्ही विकेट्सनंतर नेटकऱ्यांनी धोनीच्या स्टॅम्पींग कौशल्याबद्दल भरभरुन लिहिले. या दोन स्टंपिंगनंतर धोनी हाच जगातील सर्वात वेगवान विकेटकीपर असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाल्याची भावना धोनीच्या चाहत्यांनी व्यक्त केली.
हे भन्नाट आहे
This is something Unreal from #msdhoni#CSKvDC#Dhoni pic.twitter.com/29TVG15oxc
— Raj Parmar (@gj11ar1562) May 1, 2019
मास्टर क्लास
#Dhoni masterclass stumping in just a second pic.twitter.com/jnq3BfOUCL
— Giridharan M(@Giridharanm4720) May 1, 2019
वेगवान
Fast
Faster
Fastest
Dhoni’s stumping
#Dhoni #CSKvDC #Yellove— Phogat30_Rebirth (@sirdeepakphogat) May 2, 2019
स्टंपिंगचा देव
LORD OF STUMPING #Dhoni #CSKvDC @msdhoni pic.twitter.com/W0Yxm5FWsW
— Rohit kumar (@RK_rohit29) May 1, 2019
स्टंपिंगचे मोजमाप
Csk #IPL #Dhoni stumping meter ….. pic.twitter.com/xOcbry39dy
— sharan (@saranrajsanjay) May 1, 2019
धोनीपेक्षा जलद काहीच नाही
Nothing is faster than #Dhoni‘s stumping.#CSKvDC
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.— Riju Mishra (@cricifreak) May 1, 2019
स्टंपिंगमधील थानोस
Stumping at speed of light
#Dhoni DawwwwHaters ..Go to THANOS world pic.twitter.com/OVvaNS9CCJ
— Geeta (@Geeta_Geethu) May 1, 2019
धोनीने अशाप्रकारे जलद स्टंपिंग करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. धोनी जगभरात त्याच्या चपळ श्रेत्ररक्षणासाठी ओळखला जातो. स्टंपकडे न बघता धाव करणे असो किंवा पायांनी चेंडू थांबवणे असो प्रत्येक वेळेस धोनीने स्टंपमागे दाखवलेली चपळता संघाला अनेकदा विकेट मिळवून देते.