IPL 2019 DC vs KKR : दिल्लीच्या फिरोझशाह कोटला स्टेडियमवर दिल्ली आणि कोलकाता यांच्यात झालेल्या सामन्यात Super Overच्या माध्यमातून दिल्लीच्या संघाने विजय मिळवला. २० षटकात सामना अनिर्णित राहिल्याने Super Over खेळवण्यात आली. दिल्लीने प्रथम फलंदाजी करत Super Over मध्ये १ बाद १० धावा केल्या आणि कोलकाताला ११ धावांचे आव्हान दिले. पण कोलकाताला केवळ ७ धावाच जमवता आल्या आणि दिल्लीने विजयावर शिक्कामोर्तब केले.
दिल्लीने या सामन्यात नाणेफेक जिंकली असून कर्णधार श्रेयस अय्यर याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रसलच्या ६२ तर कार्तिकच्या ५० धावा यांच्या जोरावर कोलकाताने २० षटकात ८ बाद १८५ धावा केल्या. त्यामुळे दिल्लीला विजयासाठी १८६ धावांची गरज होती. सलामीवीर शिखर धवन ८ चेंडूत १६ धावा करून बाद झाला. त्याने २ चौकार आणि १ षटकार लगावला. पण फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला. सलामीवीर पृथ्वी शॉ ने ३० चेंडूत अर्धशतक ठोकले. त्याच्या फटकेबाजीत ४ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर झेलबाद झाला आणि दिल्लीला दुसरा धक्का बसला. त्याने ३२ चेंडूत ४३ धावांची खेळी केली. या खेळीत ४ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. पृथ्वीच्या शानदार धमाक्यामुळे सामना रंगतदार स्थितीत आला होता. मात्र या दरम्यान ऋषभ पंत बाद झाला. त्याने १५ चेंडूत ११ धावा केल्या. पृथ्वी शॉ ९९ धावांवर बाद झाला. त्याने ५५ चेंडूच्या खेळीत १२ चौकार आणि ३ षटकार मारले. प्रथमच संधी मिळालेला हनुमा विहारी लवकर झेलबाद झाला. शेवटच्या चेंडूवर २ धावा हव्या असताना दुसरी धाव घेताना दिल्लीचा फलंदाज धावबाद झाला.
त्याआधी, मराठमोळा निखिल नाईक फारसा प्रभाव पाडू शकला नाही. त्याने १६ चेंडूत ७ धावा केल्या आणि तो पायचीत झाला. त्याला पंचानी बाद ठरवल्यानंतर DRS मध्येही त्याला बाद देण्यात आले. अनुभवी फलंदाज रॉबिन उथप्पा पायचीत झाला. हर्षद पटेलने त्याला पायचीत केले आणि कोलकाताला दुसरा धक्का दिला. त्याने ६ चेंडूत ११ धावा केल्या. यात २ चौकारांचा समावेश होता. रॉबिन उथप्पा पाठोपाठ सलामीवीर ख्रिस लिनदेखील बाद झाला. ऋषभ पंतने यष्टिरक्षण करत त्याचा अप्रतिम झेल टिपला. त्याने १८ चेंडूत २० धावा केल्या. गेल्या २ सामन्यात उत्तम खेळी करणारा नितीश राणा स्वस्तात बाद झाला आणि कोलकाताचा ४ गडी माघारी परतला. त्याने केवळ १ धाव केली. रबाडाने सीमारेषेवर त्याचा उत्तम झेल टिपला. खेळपट्टीवर स्थिरावलेला शुभमन गिल धावचीत झाला. सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करून योग्य दिशेला फेकलेल्या चेंडूमुळे तो बाद झाला. त्यामुळे ६१ धावांत कोलकात्याच्या निम्मा संघ माघारी परतला. ६१ धावांत ५ गडी बाद झाल्याने कोलकात्याची अवस्था फार बिकट होती. पण कर्णधार दिनेश कार्तिक आणि धडाकेबाज आंद्रे रसलची फटकेबाजी यांच्यामुळे १४ षटकात कोलकाताने शतकी मजल मारली. अर्धशतक पूर्ण करून मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करणारा आंद्रे रसल ६२ धावांवर माघारी परतला आणि कोलकाताचा सहावा गडी बाद झाला. त्याने केवळ २८ चेंडूत ही खेळी केली. या खेळीत त्याने ४ चौकार आणि ६ षटकार खेचले. दिनेश कार्तिकने कर्णधारपदाला साजेशी खेळी करत ३५ चेंडूत अर्धशतक लगावले पण अर्धशतकानंतर लगेचच कर्णधार कार्तिक झेलबाद झाला.
या सामन्यासाठी कोलकाताच्या संघात १ मोठा बदल करण्यात आला होता. सलामीला फलंदाजी करणारा विंडीजचा प्रभावी फिरकीपटू सुनील नरिन याला संघाबाहेर व्हावे लागले. त्याच्या जागी मराठमोळ्या निखिल नाईकला संघात स्थान मिळाले. दिल्लीच्या संघात ४ महत्वाचे बदल करण्यात आले होते. किमो पॉल, राहुल तेवतिया, अक्षर पटेल, इशांत शर्मा या खेळाडूंना संघाबाहेर करण्यात आले आहे. विंडीजच्या किमो पॉलच्या जागी हनुमा विहारीला मधल्या फळीत स्थान मिळाले. फिरकीपटू राहुल तेवतिया आणि अक्षर पटेल यांच्या जागी नेपाळचा फिरकीपटू संदीप लामीचन्ने आणि मध्यमगती गोलंदाज हर्षल पटेल यांना स्थान मिळाले. तर वेगवान गोलंदाज इशांत शर्मा याच्या जागी दक्षिण आफ्रिकेचा ख्रिस मॉरिस याला संधी देण्यात आली.

पहिला चेंडू - चौकार (रसल)
दुसरा चेंडू - निर्धाव (रसल)
तिसरा चेंडू - त्रिफळाचीत (रसल)
चौथा चेंडू - १ धाव (उथप्पा)
पाचवा चेंडू - १ धावा (कार्तिक)
सहावा चेंडू - १ धाव (उथप्पा)
गोलंदाज - कागिसो रबाडा
पहिला चेंडू - १ धाव (पंत)
दुसरा चेंडू - चौकार (अय्यर)
तिसरा चेंडू - श्रेयस अय्यर झेलबाद
चौथा चेंडू - २ धावा (पंत)
पाचवा चेंडू - २ धावा (पंत)
सहावा चेंडू - १ धाव (पंत)
गोलंदाज - प्रसीद्ध कृष्ण
सुपर ओव्हरमध्ये दिल्लीला प्रथम फलंदाजी देण्यात आली आहे. धडाकेबाज ऋषभ पंत आणि कर्णधार श्रेयस अय्यर हे फलंदाजीसाठी मैदानात उतरले आहेत. तर कोलकाताकडून गोलंदाजीची जबाबदारी प्रसीद्ध कृष्णा याच्यावर आहे.
२० षटकात सामना अनिर्णित राहिल्याने आता सामन्याचा निकाल Super Over च्या माध्यमातून लागणार. शेवटच्या चेंडूवर २ धावा हव्या असताना दुसरी धाव घेताना दिल्लीचा फलंदाज धावबाद झाला.
पृथ्वी शॉ ९९ धावांवर बाद झाला. त्याने ५५ चेंडूच्या खेळीत १२ चौकार आणि ३ षटकार मारले. प्रथमच संधी मिळालेला हनुमा विहारी लवकर झेलबाद झाला. आता दिल्लीला १ चेंडूत २ धावांची गरज आहे.
पृथ्वीच्या 'शॉ'नदार धमाक्यामुळे सामना रंगतदार स्थितीत आला. मात्र या दरम्यान ऋषभ पंत बाद झाला. त्याने १५ चेंडूत ११ धावा केल्या.
कर्णधार श्रेयस अय्यर झेलबाद झाला आणि दिल्लीला दुसरा धक्का बसला. त्याने ३२ चेंडूत ४३ धावांची खेळी केली. या खेळीत ४ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता.
सलामीवीर पृथ्वी शॉ ने ३० चेंडूत अर्धशतक ठोकले. त्याच्या फटकेबाजीत ४ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. आता त्याच्याकडून मोठ्या धावसंख्येची अपेक्षा आहे.
सातव्या षटकात दिल्लीचे अर्धशतक
सलामीवीर शिखर धवन ८ चेंडूत १६ धावा करून बाद झाला. त्याने २ चौकार आणि १ षटकार लगावला. पण फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला.
दिल्लीच्या फिरोझशाह कोटला स्टेडियमवर दिल्ली विरुद्धच्या सामन्यात रसलच्या ६२ तर कार्तिकच्या ५० धावा यांच्या जोरावर कोलकाताने २० षटकात ८ बाद १८५ धावा केल्या. त्यामुळे दिल्लीला विजयासाठी १८६ धावांची गरज आहे.
दिनेश कार्तिकने कर्णधारपदाला साजेशी खेळी करत ३५ चेंडूत अर्धशतक लगावले पण अर्धशतकानंतर लगेचच कर्णधार कार्तिक झेलबाद झाला.
अर्धशतक पूर्ण करून मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करणारा आंद्रे रसल ६२ धावांवर माघारी परतला आणि कोलकाताचा सहावा गडी बाद झाला. त्याने केवळ २८ चेंडूत ही खेळी केली. या खेळीत त्याने ४ चौकार आणि ६ षटकार खेचले.
२ चौकार आणि ६ षटकार ठोकत केले अर्धशतक
६१ धावांत ५ गडी बाद झाल्याने कोलकात्याची अवस्था फार बिकट होती. पण कर्णधार दिनेश कार्तिक आणि धडाकेबाज आंद्रे रसलची फटकेबाजी यांच्यामुळे १४ षटकात कोलकाताने शतकी मजल मारली.
खेळपट्टीवर स्थिरावलेला शुभमन गिल धावचीत झाला. सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करून योग्य दिशेला फेकलेल्या चेंडूमुळे तो बाद झाला. त्यामुळे ६१ धावांत कोलकात्याच्या निम्मा संघ माघारी परतला. आता दिनेश कार्तिक आणि आंद्रे रसल यांच्यावर कोलकाताची मदार आहे.
गेल्या २ सामन्यात उत्तम खेळी करणारा नितीश राणा स्वस्तात बाद झाला आणि कोलकाताचा ४ गडी माघारी परतला. त्याने केवळ १ धाव केली. रबाडाने सीमारेषेवर त्याचा उत्तम झेल टिपला.
रॉबिन उथप्पा पाठोपाठ सलामीवीर ख्रिस लिनदेखील बाद झाला. ऋषभ पंतने यष्टिरक्षण करत त्याचा अप्रतिम झेल टिपला. त्याने १८ चेंडूत २० धावा केल्या.
अनुभवी फलंदाज रॉबिन उथप्पा पायचीत झाला. हर्षद पटेलने त्याला पायचीत केले आणि कोलकाताला दुसरा धक्का दिला. त्याने ६ चेंडूत ११ धावा केल्या. यात २ चौकारांचा समावेश होता.
मराठमोळा निखिल नाईक फारसा प्रभाव पाडू शकला नाही. त्याने १६ चेंडूत ७ धावा केल्या आणि तो पायचीत झाला. त्याला पंचानी बाद ठरवल्यानंतर DRS मध्येही त्याला बाद देण्यात आले.
कोलकाताच्या संघात १ मोठा बदल करण्यात आलेला आहे. सलामीला फलंदाजी करणारा विंडीजचा प्रभावी फिरकीपटू सुनील नरिन याला संघाबाहेर व्हावे लागले आहे. त्याच्या जागी निखिल नाईकला संघात स्थान मिळाले आहे.
दिल्लीच्या संघात ४ महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. किमो पॉल, राहुल तेवतिया, अक्षर पटेल, इशांत शर्मा या खेळाडूंना संघाबाहेर करण्यात आले आहे. विंडीजच्या किमो पॉलच्या जागी हनुमा विहारीला मधल्या फळीत स्थान मिळाले आहे. फिरकीपटू राहुल तेवतिया आणि अक्षर पटेल यांच्या जागी नेपाळचा फिरकीपटू संदीप लामीचन्ने आणि मध्यमगती गोलंदाज हर्षल पटेल यांना स्थान मिळाले आहे. तर वेगवान गोलंदाज इशांत शर्मा याच्या जागी दक्षिण आफ्रिकेचा ख्रिस मॉरिस याला संधी देण्यात आली आहे.
गेल्या सामन्यात चेन्नईकडून पराभूत झालेल्या दिल्लीने या सामन्यात नाणेफेक जिंकली असून कर्णधार श्रेयस अय्यर याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.