चेन्नईच्या चेपॉक मैदानावरील तीन प्रेक्षागृहांच्या सुसज्जतेबाबत अद्याप प्रमाणपत्र मिळालेले नसल्याने आयपीएलच्या प्ले-ऑफ किंवा अंतिम सामन्यासाठी हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमचा अतिरिक्त पर्याय तयार ठेवण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चेपॉकवरील आय, जे आणि के या तीन प्रेक्षागृहांच्या सुसज्जतेबाबत २०१२ पासून अद्यापपर्यंत स्थानिक महापालिकेकडून प्रमाणपत्र मिळालेले नाही. त्या पाश्र्वभूमीवर हैदराबादच्या मैदानाचाही पर्याय सज्ज ठेवण्यात येणार आहे, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) पदाधिकाऱ्यांनी सांगितले. इतक्या प्रदीर्घ काळापासून या प्रेक्षागृहांबाबत स्थिती स्पष्ट झालेली नाही. त्या पाश्र्वभूमीवर बीसीसीआय पदाधिकाऱ्यांनी अन्य पर्यायांची चाचपणी केली आहे.

‘‘सध्या आमची तमिळनाडू क्रिकेट असोसिएशनशी बोलणी सुरू आहेत. चेन्नईतच अंतिम सामना व्हावा, यात आमचा आक्षेप नाही. मात्र तीन रिकामे स्टँड ही आमच्यासाठी डोकेदुखी ठरू शकते. त्यामुळे आयपीएलच्या प्ले-ऑफ, एलिमिनेटर आणि अंतिम फेरीसाठी आम्ही हैदराबाद आणि बेंगळूरु हे राखीव पर्याय ठेवले आहेत,’’ असेही त्यांनी सांगितले.

IPL च्या उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक –

९ एप्रिल : चेन्नई सुपर किंग्स वि. कोलकाता नाईट राइडर्स, चेन्नई
१० एप्रिल : मुंबई इंडियन्स वि. किंग्स इलेव्हन पंजाब, मुंबई
११ एप्रिल : राजस्थान रॉयल्स वि. चेन्नई सुपर किंग्स, जयपूर
१२ एप्रिल : कोलकाता नाईट राइडर्स वि. दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता
१३ एप्रिल : मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स, मुंबई
किंग्स इलेव्हन पंजाब वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मोहाली
१४ एप्रिल : कोलकाता नाईट राइडर्स वि. चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता
सनराइझर्स हैदराबाद वि. दिल्ली कॅपिटल्स, हैदराबाद
१५ एप्रिल : मुंबई इंडियन्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मुंबई
१६ एप्रिल : किंग्स इलेव्हन पंजाब वि. राजस्थान रॉयल्स, मोहाली
१७ एप्रिल : सनराइझर्स हैदराबाद वि. चेन्नई सुपर किंग्स, हैदराबाद
१८ एप्रिल : दिल्ली कॅपिटल्स वि. मुंबई इंडियन्स, दिल्ली
१९ एप्रिल : कोलकाता नाइट राइडर्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, कोलकाता
२० एप्रिल : राजस्थान रॉयल्स वि. मुंबई इंडियन्स, जयपूर
दिल्ली कॅपिटल्स वि. किंग्स इलेव्हन पंजाब, दिल्ली
२१ एप्रिल : सनराइझर्स हैदराबाद वि. कोलकाता नाईट राइडर्स, हैदराबाद
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. चेन्नई सुपर किंग्स, बंगळुरू
२२ एप्रिल : राजस्थान रॉयल्स वि. दिल्ली कॅपिटल्स, जयपूर
२३ एप्रिल : चेन्नई सुपर किंग्स वि. सनराइझर्स हैदराबाद, चेन्नई
२४ एप्रिल : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. किंग्स इलेव्हन पंजाब, बंगळुरू
२५ एप्रिल : कोलकाता नाईट राइडर्स वि. राजस्थान रॉयल्स, कोलकाता
२६ एप्रिल : चेन्नई सुपर किंग्स वि. मुंबई इंडियन्स, चेन्नई
२७ एप्रिल : राजस्थान रॉयल्स वि. सनराइझर्स हैदराबाद, जयपूर
२८ एप्रिल : दिल्ली कॅपिटल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दिल्ली
कोलकाता नाईट राइडर्स वि. मुंबई इंडियन्स, कोलकाता
२९ एप्रिल : सनराइझर्स हैदराबाद वि. किंग्स इलेव्हन पंजाब, हैदराबाद
३० एप्रिल : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. राजस्थान रॉयल्स, बंगळुरू
१ मे : चेन्नई सुपर किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई
२ मे : मुंबई इंडियन्स वि. सनराइझर्स हैदराबाद, मुंबई
३ मे : किंग्स इलेव्हन पंजाब वि. कोलकाता नाईट राइडर्स, मोहाली
४ मे : दिल्ली कॅपिटल्स वि. राजस्थान रॉयल्स, दिल्ली
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. सनराइझर्स हैदराबाद, बंगळुरू
५ मे : किंग्स इलेव्हन पंजाब वि. चेन्नई सुपर किंग्स, मोहाली
मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाईट राइडर्स, मुंबई

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2019 hyderabad stadium is one of the option for final match
First published on: 09-04-2019 at 00:39 IST