मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जवर मात करत मुंबईने बाराव्या हंगामातील आपल्या दुसऱ्या विजयाची नोंद केली. फलंदाजीदरम्यान हार्दिक पांड्याने अखेरच्या षटकांमध्ये केलेली हाणामारी आणि गोलंदाजीत केलेला टिच्चून मारा या जोरावर मुंबईने बुधवारी झालेल्या सामन्यात बाजी मारली. चेन्नईच्या ब्राव्होने या सामन्यात सूर्यकुमार यादवचा बळी घेत, चेन्नईकडून बळींचं शतक पूर्ण केलं. मात्र हार्दिक पांड्याने अखेरच्या षटकात ब्राव्होच्या षटकात २९ धावा कुटत सामन्याचं चित्रच पालटवून टाकलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अवश्य वाचा – IPL 2019 : मुंबईविरुद्ध सामन्यात DJ Bravo चमकला, चेन्नईकडून बळींचं शतक

ब्राव्होचं हे अखेरचं षटक, बाराव्या हंगामातलं सर्वात महागडं षटक ठरलं आहे. या षटकामुळे सामन्याचं पारडं मुंबईच्या बाजूने झुकल्याचं, चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीनेही मान्य केलं. मुंबईच्या फलंदाजांनी अखेरच्या षटकांमध्ये आपलं वर्चस्व गाजवत, ६ षटकांमध्ये ८८ धावा काढल्या.

आयपीएलच्या बाराव्या हंगामातील आतापर्यंत सर्वात महागडं षटक –

हार्दिक पांड्या-कायरन पोलार्ड : २९ धावा (गोलंदाज – ब्राव्हो)

महेंद्रसिंह धोनी-रविंद्र जाडेजा : २८ धावा (गोलंदाज – जयदेव उनाडकट)

सुनिल नरीन : २५ धावा (गोलंदाज – वरुण चक्रवर्ती)

रॉबिन उथप्पा-आंद्रे रसेल : २५ धावा (गोलंदाज – मोहम्मद शमी)

चेन्नईकडून मराठमोळ्या केदार जाधवचा अपवाद वगळता एकही फलंदाज मुंबईच्या गोलंदाजाचा सामना करु शकला नाही. अखेरच्या षटकात चेन्नईच्या फलंदाजांनी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुंबईच्या क्षेत्ररक्षकांनी त्यांचे प्रयत्न सफल होऊ दिले नाही. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा हा शंभरावा विजय ठरला. आतापर्यंत एकाही संघाला अशी कामगिरी करणं जमलेलं नाहीये.

अवश्य वाचा – Video : पोलार्डने घेतलेला हा झेल तुम्हालाही थक्क करेल, जरुर पाहा…

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2019 mi vs csk dwayne bravo creates unwanted record after nightmarish final over vs mi clash
First published on: 04-04-2019 at 14:30 IST