scorecardresearch

Premium

IPL 2021: कोरबो..लोरबो..जीतबो…! मुंबईला पराभूत करत गुणतालिकेत कोलकाता चौथ्या स्थानी

कोलकात्यानं मुंबई इंडियन्सचा ७ गडी राखून पराभव केला. मुंबईनं कोलकात्यासमोर विजयासाठी १५६ धावांचं आव्हान दिलं होतं.

Kolkata-Won
मुंबईला पराभूत करत गुणतालिकेत कोलकाता चौथ्या स्थानी

कोलकात्यानं मुंबई इंडियन्सचा ७ गडी राखून पराभव केला. मुंबईनं कोलकात्यासमोर विजयासाठी १५६ धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र हे आव्हान कोलकात्यानं ३ गडी गमवून १६ व्या षटकात पूर्ण केलं. वेंकटेश अय्यर आणि राहुल त्रिपाठी यांच्या अर्धशतकी खेळीमुळे हा विजय सोपा झाला. मुंबई इंडियन्सकडून जसप्रीत बुमरानं ३ गडी बाद केले. या पराभवानंतर मुंबई संघाची सहाव्या स्थानावर घसरण झाली आहे. तर कोलकात्याचा संघ चौथ्या स्थानावर पोहोचला. मुंबईला प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग या पराभवामुळे खडतर झाला आहे. गुणतालिकेत दिल्ली पहिल्या स्थानी, चेन्नई दुसऱ्या स्थानी, बंगळुरु तिसऱ्या स्थानी, तर कोलकाता चौथ्या स्थानी आहे. राजस्थाननं पंजाबला पराभूत केल्यानं पाचव्या स्थानी पोहोचला आहे. तर आजच्या पराभवाचा फटका मुंबईला बसला असून पाचव्या स्थानी पोहोचला आहे.

कोलकात्याचा डाव

World Cup 2023: Will Team India repeat 2011 World Cup history Fans made funny comments after seeing the new practice jersey
World Cup 2023: टीम इंडिया २०११च्या वर्ल्डकप इतिहासाची पुनरावृत्ती करणार का? नव्या सरावाची जर्सी पाहून चाहत्यांनी केल्या मजेशीर कमेंट्स
News About Gautami Patil
नागपूरमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा! खुर्च्यांची तोडफोड झाल्यानंतर पोलिसांचा सौम्य लाठीमार
Two people died Gondia district
गोंदिया : दोघांचा मृत्यू! एक नदीत बुडाला, दुसऱ्याने तलावात उडी घेतली…
IND vs AUS: Team India arrives in Rajkot for 3rd ODI Rohit Brigade ready to whitewash Australia watch Video
IND vs AUS: तिसर्‍या वन डेसाठी टीम इंडिया पोहोचली राजकोटला; ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश देण्यासाठी रोहित ब्रिगेड सज्ज, पाहा Video

कोलकाता संघानं मुंबईनं दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना आक्रमक खेळी केली. शुभमन गिल आणि वेंकटेश अय्यर या जोडीनं चांगली सुरुवात केली. शुबमन गिल १३ धावा करून बाद झाला. त्याने एक षटकार आणि एक चौकार मारला. जसप्रीत बुमराच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्यानंतर दुसऱ्या गड्यासाठी राहुल त्रिपाठी आणि वेंकटेश अय्यरने अर्धशतकी भागीदारी केली. कोलकात्याच्या वेंकटेश अय्यरने विस्फोटक फलंदाजी करत २५ चेंडूत अर्धशतक झळकावलं. या खेळीत ३ षटकार आणि ४ चौकारांचा समावेश आहे. ५३ धावांवर असताना बुमराच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. अय्यरनंतर राहुल त्रिपाठीने अर्धशतक झळकावलं. त्रिपाठीने ४२ चेंडूत नाबाद ७४ धावांची खेळी केली. कोलकात्याचा कर्णधार इऑन मॉर्गनला साजेशी खेळी करता आली नाही. तो ७ करून बाद झाला.

मुंबईचा डाव

मुंबईनं कोलकात्यासमोर विजयासाठी १५६ धावांचं आव्हान ठेवलं होतं. मुंबई विरुद्धच्या सामन्यात कोलकात्याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यानंतर फलंदाजीसाठी आघाडीला आलेल्या कर्णधार रोहित शर्मा आणि डिकॉकने चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी केली. रोहित शर्माने ३० चेंडूत ३३ धावा करून बाद झाला. तर डिकॉकने अर्धशतकी खेळी केली. डिकॉकने ४२ चेंडूत ५५ धावा केल्या. या व्यतिरिक्त इतर फलंदाज साजेशी कामगिरी करू शकले नाही. मोठे फटके मारताना एका मागोमाग एक बाद झाले. सुर्यकुमार ५ धावा, इशान किशन १४ धावा, पोलार्ड २१ धावा, तर कृणाल पांड्या १२ धावा करून बाद झाला. कोलकात्याकडून प्रसिद्ध क्रिष्णाने २, लॉकी फर्ग्युसनने २, तर सुनील नरेननं एक गडी बाद केला. तर किरॉन पोलार्डला इऑन मोर्गननं धावचीत केलं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ipl 2021 kkr won against mumbai indians rmt

First published on: 24-09-2021 at 00:04 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×