आयपीएल २०२१मध्ये आज चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) यांच्यात सामना रंगणार आहे. या हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात हा पहिला सामना शारजाह क्रिकेट मैदानावर खेळला जाणार आहे. सामन्यापूर्वी चेन्नईच्या खेळाडूंनी मैदानावर भरपूर घाम गाळला. या दरम्यान संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि रवींद्र जडेजा यांच्यात स्पर्धाही झाली. सीएसकेने हा खास व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला, ज्यात धोनीने जडेजासमोर फिरकी गोलंदाजी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हिडिओ अपलोड करताना चेन्नई सुपर किंग्जने लिहिले, ‘७ विरुद्ध ८, धोनी विरुद्ध जडेजा, सरावादरम्यानचा सुपर स्पेशल क्षण. व्हिडिओमध्ये, धोनीने फक्त गोलंदाजी केली, ज्यावर जडेजाने षटकार ठोकले आणि काही चेंडूंचा बचाव केला. या जोरदार स्पर्धेच्या शेवटी धोनी विजेता ठरला. त्याने रवींद्र जडेजाला क्लीन बोल्ड केले.

हेही वाचा – क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! टीम इंडियाच्या टी-२० वर्ल्डकप विजयावर येतोय चित्रपट; नावाचीही झाली घोषणा

आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात आज चेन्नई आणि बंगळुरू शारजाह क्रिकेट मैदानावर आमनेसामने येतील. गुणतालिकेत चेन्नई १२ गुणांसह दुसऱ्या स्थानावर कायम आहे, तर बंगळुरूचा संघही १० गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. चेन्नईने त्यांच्या मागील सामन्यात मुंबई इंडियन्सचा २० धावांनी पराभव केला, तर बंगळुरूला कोलकाताविरुद्ध लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. कोलकाताविरुद्ध आरसीबीचा संघ ९२ धावांवर ऑल आऊट झाला.

दोन्ही संघांमधील पहिल्या टप्प्यातील सामन्यात धोनीच्या संघाने ६९ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात रवींद्र जडेजाने अष्टपैलू खेळाडूची भूमिका बजावली. त्याने फलंदाजी करताना २८ चेंडूत ६२ धावा केल्या, गोलंदाजीत १३ धावा देऊन ३ विकेट घेतल्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2021 ms dhoni bowls to ravindra jadeja at the nets adn
First published on: 24-09-2021 at 17:58 IST