आयपीएल २०२१ स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं आव्हान संपुष्टात आलं आहे. असं असलं तरी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळणाऱ्या हर्षल पटेलनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हर्षल पटेलनं आपल्या गोलंदाजीचं उत्तम प्रदर्शन केलं. हर्षलने एका हंगामात सर्वाधिक बळी घेण्याच्या विक्रमात ड्वेन ब्राव्होची बरोबरी केली आहे. ब्राव्होन २०१३ मध्ये ३२ गडी बाद केले होते. हर्षल पटेलनं १५ सामन्यात एकूण ३२ गडी बाद केले. यात २७ धावा देत ५ गडी बाद केल्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

हर्षलने आधीच भारतीय गोलंदाजाने आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा रेकॉर्ड मोडला आहे. हा रेकॉर्ड बुमराहाच्या नावे होता. बुमराहने २०२० च्या हंगामात आयपीएलमध्ये २७ विकेट्स घेत सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज ठरला होता. दरम्यान हर्षलने हैदराबादविरोधात तीन विकेट्स घेत हा रेकॉर्ड मोडला होता.

आयपीएल हंगामात सर्वाधिक विकेट्स:

हर्षलने आपल्या नावावर अनेक रेकॉर्ड केले आहेत. अनकॅप्ड गोलंदाजाने सर्वाधिक विकेट्स घेण्याचा रेकॉर्डही त्याच्या नावावर आहे. या हंगामात पर्पल कॅपचा मानकरी हर्षल पटेलच असणार आहे. कारण दुसऱ्या क्रमांकावर अवेश खान असून त्याच्या नावे २३ विकेट्स आहेत. त्यामुळे हर्षल पटेलकडे नऊ विकेट्स जास्त आहेत.