राजस्थान रॉयल्सचा कप्तान संजू सॅमसन आयपीएल २०२१ मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. सॅमसनने आज सोमवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ८२ धावांची खेळी करत ही कामगिरी केली. त्याने यंदाच्या हंगामात आतापर्यंत एक शतक आणि दोन अर्धशतके केली आहेत. याशिवाय त्याने ४१ चौकार आणि १५ षटकार ठोकले आहेत. म्हणजेच त्याने ५६ चेंडूत २५४ धावा केल्या आहेत. सॅमसनने गेल्या सामन्यात दिल्लीविरुद्ध अर्धशतकही केले होते.

संजूने आयपीएलमध्ये ३००० धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो १९वा फलंदाज बनला आहे. ११९ धावा ही त्याची आयपीएलमधील सर्वोत्तम खेळी आहे. संजूने आतापर्यंत आयपीएलच्या इतिहासात तीन शतके आणि 15 अर्धशतके केली आहेत. संजूच्या आता ११७ आयपीएल सामन्यांमध्ये ३०१७ धावा झाल्या आहेत. हैदराबादविरुद्धच्या डावात त्याने सात चौकार आणि तीन षटकार मारले.

सॅमसनने आयपीएल २०१९ मध्ये ३४२ धावा आणि २०२० मध्ये ३७५ धावा केल्या. त्याने आता या मोसमात १० सामन्यांत ४३३ धावा केल्या आहेत आणि दिल्ली कॅपिटल्सच्या शिखर धवनकडून ऑरेंज कॅपही घेतली आहे.

हेही वाचा – टी-२० वर्ल्डकपसाठी टीम इंडिया यूएईमध्ये कुठे राहणार?; ‘महत्त्वाची’ माहिती आली समोर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नाणेफेक जिंकलेल्या राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ५ बाद १६४ धावा केल्या. संजू व्यतिरिक्त यशस्वी जयस्वालने ३६ धावांचे योगदान दिले. महिपाल २९ धावांवर नाबाद राहिला. गोलंदाजीत हैदराबादकडून सिद्धार्थ कौलने दोन, तर राशिद खान आणि भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी एक बळी घेतला.