कोलकाता नाइट रायडर्सने आयपीएलच्या १५व्या हंगामासाठी कर्णधारपदाची घोषणा केली आहे. फ्रेंचायझीने २७ वर्षीय श्रेयस अय्यरची संघाचा नवा कर्णधार म्हणून निवड केली आहे. तो कोलकाताचा एकूण सहावा कर्णधार असेल. यापूर्वी सौरव गांगुली, ब्रेंडन मॅक्क्युलम, गौतम गंभीर, दिनेश कार्तिक आणि इऑन मॉर्गन यांनी केकेआरचे नेतृत्व केले आहे. कोलकाता संघ दोन वेळा चॅम्पियन आहे. २०१२ मध्ये कोलकाताने चेन्नईचा तर २०१४ मध्ये पंजाबला फायनलमध्ये पराभूत केले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्रेयस अय्यरला यंदा कोलकाता संघाने १२.२५ कोटी रुपयांना संघात दाखल केले आहे. अय्यर प्रथमच कोलकात्याकडून खेळणार आहे. तो एक विश्वासार्ह फलंदाज आहे आणि गरज पडेल तेव्हा तो स्फोटक फलंदाजीही करू शकतो. अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्लीचा संघ दोनदा प्लेऑफमध्ये पोहोचला आहे.

हेही वाचा – विश्लेषण : सव्वाबारा कोटींचा श्रेयस अय्यर!; कोलकात्याचा कर्णधार? आणि मग भारताचा?

हेही वाचा – विश्लेषण : IPLऑक्शननंतर खेळाडूंना पैसे कसे आणि किती मिळतात? जाणून घ्या…

२०१९ मध्ये, अंतिम चारमध्ये पोहोचल्या दिल्ली संघाने आणि २०२० मध्ये अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. मुंबईने विजेतेपदाच्या लढतीत दिल्लीचा पराभव केला. अशा स्थितीत अय्यरच्या कर्णधारपदावर कोलकाताचा पूर्ण विश्वास असेल. याच कारणामुळे कोलकाताने त्याला एवढी मोठी किंमत देऊन आपल्या संघात समाविष्ट केले आहे. ८७ आयपीएल सामन्यांमध्ये अय्यरने ३१.६७च्या सरासरीने २३७५ धावा केल्या आहेत. आयपीएलमधील अय्यरची सर्वात मोठी खेळी ९६ धावांची होती.

कोलकाता नाइट रायडर्स संघ

व्यंकटेश अय्यर, नितीश राणा, श्रेयस अय्यर (कर्णधार), शेल्डन जॅक्सन, अजिंक्य रहाणे, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरिन, पॅट कमिन्स, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती, सॅम बिलिंग्ज, अनुकुल रॉय, रसिक सलाम, अभिजित तोमर, प्रथम सिंह, अमन खान, रमेश कुमार, अशोक शर्मा, टिम साऊदी, अॅलेक्स हेल्स, मोहम्मद नबी, उमेश यादव, बी इंद्रजीत, चमिका करुणारत्ने.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2022 shreyas iyer has been appointed as captain of kkr adn
First published on: 16-02-2022 at 16:33 IST