IPL Auction 2024 Date Place Teams Marathi News: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) एकदिवसीय विश्वचषकादरम्यान आयपीएलची तयारी सुरू केली आहे. आयपीएलच्या आगामी हंगामासाठी खेळाडूंच्या लिलावासाठी एक रूपरेषा तयार केली जात आहे. बोर्डाने केवळ आयपीएलसाठीच नाही तर महिला प्रीमियर लीगसाठी (डब्ल्यूपीएल) योजना आखल्या आहेत. या दोन्ही स्पर्धांसाठी खेळाडूंचा लिलाव डिसेंबरमध्ये होऊ शकतो, असे मानले जात आहे.

आयपीएलचा लिलाव दुबईत होऊ शकतो. यासाठी बीसीसीआय आपल्या योजनांना अंतिम रूप देत आहे. बोर्ड १५ ते १९ डिसेंबर दरम्यान लिलाव आयोजित करू शकते. महिला प्रीमियर लीग (WPL) साठी लिलाव ९ डिसेंबर रोजी होणे अपेक्षित आहे. डब्ल्यूपीएल लिलावाचे ठिकाण निश्चित झाले नसले तरी ते भारतात असण्याची शक्यता आहे. मात्र, बोर्डाकडून फ्रँचायझींना कोणताही अधिकृत मेल पाठवण्यात आलेला नाही.

Irfan Pathan Picks 15 Man Squad
Team India : इरफान पठाणने टी-२० विश्वचषकासाठी १५ खेळाडूंची केली निवड, हार्दिक पंड्यासमोर ठेवली ‘ही’ अट
Sanju Samson should be groomed as next T20 captain for India after Rohit says Harbhajan Singh
Team India : रोहितनंतर भारताचा टी-२० कर्णधार कोण होणार? हार्दिक-पंतकडे दुर्लक्ष करत हरभजनने सांगितले ‘हे’ नाव
ben stoke
बेन स्टोक्सची ट्वेन्टी-२० विश्वचषकातून माघार
Champions League T20 to resume
Champions League T20 : १० वर्षांनंतर चॅम्पियन्स टी-२० लीग खेळवली जाणार? भारतासह ‘या’ तीन देशांनी दाखवले स्वारस्य

हेही वाचा: ENG vs SL: इंग्लंड-श्रीलंकासाठी आज ‘करो या मरो’! जो संघ पराभूत होईल त्याच्यासाठी सेमीफायनलचे दरवाजे बंद? जाणून घ्या

आयपीएल लिलाव कधी होणार?

बीसीसीआयने या लिलावाबाबत कोणतीही औपचारिक माहिती फ्रँचायझींना पाठवली नाही. हा लिलाव दुबईत होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. साधारणतः १८ किंवा १९ डिसेंबर रोजी आयोजित केले जाऊ शकते. बीसीसीआयने गेल्या वर्षीचा लिलाव इस्तंबूलमध्ये आयोजित करण्याचा विचार केला होता पण शेवटी कोचीचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत, दुबईची योजना तात्पुरती असू शकते, परंतु सर्व आयपीएल फ्रँचायझींना दुबईला लिलावाचे ठिकाण म्हणून विचारात घेण्यास सांगितले आहे.

ट्रेडिंग विंडो सध्या खुली आहे, परंतु अद्याप IPL फ्रँचायझींमध्ये खेळाडूंच्या व्यापाराचा कोणताही अहवाल आलेला नाही. त्यामुळे लवकरच रिटेन केलेल्या आणि सोडण्यात आलेल्या खेळाडूंची यादीही बाहेर येण्यास सुरुवात होईल, असे मानले जात आहे. दरम्यान, बीसीसीआयने महिला प्रीमियर लीग (WPL) लिलावाचे ठिकाण आणि तारखांबाबत मालकांना अद्याप माहिती दिलेली नाही. अशी शक्यता वर्तवली जात आहे की लीग यावर्षी फेब्रुवारीमध्ये आयोजित केली जाऊ शकते. वास्तविक, महिला संघाला जानेवारीच्या मध्यात आंतरराष्ट्रीय सामने खेळायचे आहेत.

हेही वाचा: IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध सामन्यात अश्विन खेळण्याची शक्यता, रोहित शर्माने काय आखली योजना? जाणून घ्या

डब्ल्यूपीएल एकाच शहरात होणार की आयपीएलसारख्या वेगवेगळ्या शहरात होणार याबाबत संघांना पुष्टी मिळालेली नाही. माहितीसाठी की, गेल्या वर्षी संपूर्ण लीग मुंबईत आयोजित करण्यात आली होती.