आयपीएल २०२३ साठी मिनी लिलाव २३ डिसेंबर रोजी कोची येथे होणार आहे. याआधी सर्व १० संघानी आपल्या संघात कोणाला घ्यायचे याबाबत तयारी केली सुरु केली आहे. त्याचबरोबर कोणत्या खेळाडूला कितीपर्यंत बोली लावायची या संदर्भात प्लॅन ठरला असणार आहे. अशात माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी मुंबई इंडियन्सबद्दल एक भविष्यवाणी केली आहे. त्यांनी मुंबई इंडियन्स संघ कोणत्या दोन खेळाडूंसाठी पैशांचा पाऊस पाडू शकतो, याबाबत खुलासा केला आहे.

संजय मांजरेकर यांनी मुंबई इंडियन्सला बोली लावण्यासाठी दोन खेळाडूंची नावे सुचवली आहेत. ज्यामध्ये त्यांनी अ‍ॅडम झाम्पा आणि आदिल रशीद यांचा उल्लेख केला आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी मुंबई इंडियन्स संघाबद्दल म्हणाले, “तुम्ही त्यांच्या गोलंदाजी आक्रमणाकडे पाहता तेव्हा तुम्हाला माहिती आहे. त्यांना गेल्या वेळी त्रास झाला होता. पण आता त्यांच्याकडे जोफ्रा आर्चर आहे, बुमराह तंदुरुस्त आहे, त्यांच्याकडे जेसन बेहरेनडॉर्फ आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे हे दर्जेदार आक्रमण आहे, त्यामुळे ही समस्या नाही.”

आणखी वाचा – IPL 2023 Auction: कर्णधारपदासाठी सनरायझर्स ‘या’ भारतीय खेळाडूवर लावतील पैज, इरफान पठाणने काव्या मारनला सुचवले नाव

मांजरेकर पुढे म्हणाले, “रोहित शर्मा देखील फॉर्ममध्ये आला आहे, पण लेग-स्पिनचा विचार केला तर आता प्रत्येक आयपीएल संघाला रशीद खान सारख्या खेळाडूची गरज आहे. म्हणून, ते त्यांच्यासाठी रशीद खान किंवा सुनील नरीनच्या शोधात आहेत. त्याचबरोबर झम्पासारखे किंवा आदिल रशीद लेग-स्पिनर शोधण्याच्या समीकरणात येऊ शकतात. त्यामुळे, गेल्या मोसमात त्यांची कामगिरी असूनही तिन्ही पैलू चांगले दिसतात. होय एक मनगटी स्पिनर, एम अश्विनला त्यांनी जाऊ दिले. त्यांच्याकडे फिरकीपटूंचा इतिहास आहे, त्यांच्याकडे मार्कंडे, राहुल होते. चहर, त्याला कधीही जाऊ द्यायला नको होते, तो गेला आहे. त्यामुळे झाम्पा किंवा आदिल रशीदसारखा परदेशी फिरकीपटू कदाचित त्यांच्यासाठी योग्य असेल.”

हेही वाचा – ‘आयपीएल’मध्येही प्रभावी खेळाडूचा नियम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयपीएलचा १५ वा हंगाम (IPL 2022) मुंबई इंडियन्ससाठी एका खूप वाईट स्वप्नाप्रमाणे होता. मुंबई इंडियन्सने १४ पैकी केवळ ४ सामने जिंकले होते. त्यामुळे मुंबई पॉइंट टेबलमध्ये तळाच्या १०व्या स्थानावर होती. म्हणून आयपीएल २०२३ साठी ५ वेळा आयपीएल चॅम्पियन संघाला खूप समजून घेऊन रणनीती बनवावी लागणार आहे.