आयपीएल संघमालकांना षटकार ठोकणारे खेळाडूच आवडतात असं मत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने व्यक्त केलं. षटकार मारणारे खेळाडू सामने जिंकून देतात त्यामुळे संघमालकांना असे खेळाडू आवडतात असं डू प्लेसिस म्हणाला.

दक्षिण आफ्रिकेचा विकेटकीपर बॅट्समन हेनरिच क्लासनने डू प्लेसिसला आयपीएलमधील सातत्यपूर्ण खेळाचं रहस्य काय? असं विचारलं. त्यावर डू प्लेसिसने हे उत्तर दिलं. क्लासनने यंदाच्या आणि गेल्या वर्षीही आयपीएल हंगामात ४०० धावांची वेस ओलांडली. क्लासनचं जेतेपदाचं स्वप्न मात्र यंदा पूर्ण होऊ शकलं नाही.

ईएसपीएन क्रिकइन्फोच्या ‘द क्रिकेट मंथली’शी बोलताना क्लासनने डू प्लेसिसने दिलेल्या सल्लाबद्दल सांगितलं. त्याने सांगितलं, ‘अलीकडेच मी फाफला त्याच्या आयपीएलमधील सातत्यपूर्ण कामगिरीविषयी विचारलं. तो गंमतीने म्हणाला आयपीएल संघमालकांना षटकार मारणारे खेळाडू आवडतात कारण ते सामने जिंकून देतात’.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘पॉवर गेम अर्थात जोरदार टोलेबाजी करण्यात मानसिकतेचा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. क्लासनची षटकार लगावण्याची क्षमता अचंबित करणारी आहे. दर सातव्या चेंडूवर क्लासन षटकार लगावतो. मी बॅट स्विंग ड्रिल्स करतो. षटकार लगावण्यासाठी असा सराव करणं आवश्यक आहे. भारतात बाऊंड्रीपर्यंतचं अंतर कमी ठेवलं जातं याकडेही क्लासनने लक्ष वेधलं. त्यामुळे षटकार लगावणं सोपं होतं असं क्लासन म्हणाला.