IPL 2023 Points Table Latest Update : आयपीएल २०२३ मध्ये कोणते चार संघ आहेत, जे प्ले ऑफ मध्ये क्वालीफाय करतील, यावर माजी क्रिकेटर आकाश चोप्राने मोठी भविष्यवाणी केली आहे. आकाश म्हणाला, सध्याच्या स्थितीत जे चार संघ गुणतालिकेत टॉप-४ मध्ये आहेत, तेच संघ प्ले ऑफ मध्ये प्रवेश करतील. आता गुणतालिकेत जास्त बदल होण्याची शक्यता नाहीय. जे संघ यावेळी अव्वल स्थानावर आहेत, त्यांची पुढे जाण्याची शक्यता जास्त आहे.
लखनऊ सुपर जायंट्सने शुक्रवारी मोहालीत खेळवलेल्या सामन्यात पंजाब किंग्जचा पराभव करून मोठ्या विजयाला गवसणी घातली. त्यांनी पंजाब किंग्जला मोठ्या फरकाने हरवलं आणि गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचले. आता पहिल्या स्थानावर राजस्थान रॉयल्स, दुसऱ्या स्थानावर लखनऊ सुपर जायंट्स, तिसऱ्या नंबरवर गुजरात टायटन्स आणि चौथ्या क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्ज आहे.
आता गुणतालिकेत बदल होण्याची शक्यता कमी आहे – आकाश चौप्रा
आकाशने यू-ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून म्हटलं, लखनऊचा संघ आता दुसऱ्या स्थानावर आला आहे. त्यामुळे त्यांचं अभिनंदन करतो. आता तुम्ही जे टॉप-४ संघ पाहत आहात, हेच संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर राहतील, असं वाटतंय. खूप जास्त बदल होण्याची शक्यता नाहीय.
लखनऊ सुपर जायंट्सने मोहालीत झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जचा ५६ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत लखनऊने निर्धारीत २० षटकात ५ विकेट्स गमावत २५७ धावांपर्यंत मजल मारली. ही धावसंख्या आयपीएल इतिहासातील दुसरी मोठी धावसंख्या आहे. या धावांचा पाठलाग करताना पंजाब किंग्जचा आख्खा संघ १९.५ षटकात २०१ धावांवर गारद झाला. टीमकडून फक्त अथर्व तायडेने चांगली फलंदाजी केली. लखनऊसाठी नवीन उल हकने ३ आणि यश ठाकूरने ४ विकेट्स घेतल्या.