Akash Madhwal experience of bowling to MS Dhoni for the first time: आयपीएल २०२३ च्या एलिमिनेटर सामन्यात मुंबईने लखनऊचा ८१ धावांनी पराभव केला. या सामनन्यात लखनऊविरुद्ध धारदार गोलंदाजी करणारा आकाश मधवाल चर्चेत आला आहे. आकाशने लखनऊविरुद्धच्या सामन्यात ५ विकेट घेत मुंबईच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती. आता आकाश क्वालिफायर २ साठी तयारी करत आहे. दुसरा क्वालिफायर सामना शुक्रवारी गुजरात आणि मुंबई यांच्यात होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुजरातविरुद्ध आकाशची कशी तयारी आहे?

क्वालिफायरच्या दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स जिंकल्यास अंतिम फेरीत त्यांचा सामना चेन्नई सुपर किंग्जशी होईल. गुजरातविरुद्धच्या सामन्यापूर्वी बोलताना आकाश मधवाल म्हणाला की, तो आतापर्यंत जे काही करत आहे, त्यापेक्षा चांगले करण्याचा तो प्रयत्न करेल. त्याचबरोबर आपल्या संघाला अंतिम फेरीत नेण्यासाठी कठोर परिश्रम करण्याचा प्रयत्न करेल.

आकाशने सांगितले माहीचा किस्सा –

एलिमिनेटरमध्ये मुंबईच्या विजयानंतर, आकाश मधवाल जिओ सिनेमावर चॅटसाठी हजर झाला जेथे त्याची सुरेश रैना, आरपी सिंग आणि अनंत त्यागी यांनी मुलाखत घेतली. या संवादादरम्यान आकाशने सुरेश रैनाच्या प्रश्नाला उत्तर देताना एमएस धोनीला पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा अनुभव सांगितला.

हेही वाचा – VIDEO: धोनी-जडेजामध्ये सर्व ठीक? अष्टपैलू खेळाडू आणि सीएसकेचे सीईओ यांच्यातील ‘या’ संवादामुळे चाहत्यांचे वाढले टेन्शन

धोनीची एन्ट्री पाहून आकाशला धक्काच बसला होता –

आकाशने सांगितले की, त्याने चेपॉकमध्ये भैय्या (धोनी) ला दोन चेंडू टाकले होते. त्याआधी त्याने कॉनवेला बाद केले आणि माही भाई बॅटिंगला येत असताना स्टेडियममध्ये एवढा गोंगाट झाला की त्याला काहीच ऐकू येत नव्हते.

हेही वाचा – IPL 2023: आकाश मधवालने एलिमिनेटरमध्ये रचला इतिहास, ‘या’ खेळाडूचा १३ वर्षांपूर्वीचा मोडला विक्रम

रोहित भैयाचा खूप पाठिंबा मिळाला –

या संवादादरम्यान आकाशने मुंबईचा कर्णधार रोहित शर्माचेही कौतुक केले. त्याच्या शानदार गोलंदाजीचे श्रेय त्याने रोहित शर्माला दिले. आकाशने सांगितले की, “मी खेळाचा आनंद घेत आहे आणि माझा आत्मविश्वास वाढवत आहे. शिवाय रोहित भैय्याचाही खूप पाठिंबा मिळत आहे.” इरफान पठाणनेही आकाशच्या कामगिरीसाठी रोहित शर्माचे कौतुक केले आहे.

हेही वाचा – IPL 2023: आकाश मधवालने एलिमिनेटरमध्ये रचला इतिहास, ‘या’ खेळाडूचा १३ वर्षांपूर्वीचा मोडला विक्रम

आकाश मधवालची आयपीएलमधील कामगिरी –

गेल्या वर्षी सूर्यकुमार यादव जखमी असताना आकाशला मुंबई इंडियन्सने संघात घेतले होते. आयपीएलमध्ये खेळणारा तो उत्तराखंड क्रिकेट संघाचा पहिला खेळाडू आहे. त्याने ७ सामन्यात २१.३ षटकात १६७ धावा देत १३ बळी घेतले आहेत. त्याने एका सामन्यात एकदा ४ तर एकदा ५ विकेट्स घेतल्या आहेत. लखनौविरुद्धच्या सामन्यात त्याने २१ चेंडू टाकले आणि ५ धावांत ५ बळी घेतले. त्याचबरोबर १७ चेंडूंत एकही धाव दिली नाही.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akash madhwal recounts the experience of bowling to ms dhoni for the first time vbm
First published on: 25-05-2023 at 14:58 IST