scorecardresearch

PBKS vs KKR: ‘IPL’ मध्ये आंद्रे रसेलच्या धमाक्याला सुरुवात, षटकार ठोकत चेंडू पोहोचवला थेट गॅलरीत, Video व्हायरल

IPL 2023 Punjab Kings vs Kolkata Knight Riders : आंद्रे रसलने पंजाबच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला, पाहा व्हिडीओ.

IPL 2023 PBKS vs KKR Match
: पंजाब किंग्स वि कोलकाता नाइट रायडर्स मॅच अपडेट्स

IPL 2023, PBKS vs KKR Cricket Score Update : पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आयपीएलचा दुसरा सामना मोहालीच्या ब्रिंद्रा स्टेडियममध्ये सुरु आहे. कोलकाताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पंजबच्या फलंदाजांनी अप्रतिम खेळी करत २० षटकांत ५ विकेट्स गमावून १९१ धावा केल्या. परंतु, या धावांचा पाठलाग करताना कोलकातान नाईट रायडर्सच्या फलंदाजांना संघर्ष करावा लागला. कोलकाताचे टॉप ऑर्डरचे फलंदाज स्वस्ता माघारी परतले. कारण पंजाबच्या वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने एकाच षटकात दोन विकेट्स घेतल्या होत्या. कोलकाताने १६ षटकांत ७ विकेट्स गमावत १४६ धावा केल्या होत्या. कोलकाताला ४ षटकात २४ धावांची गरज असताना मैदानात पाऊस पडला. त्यानंतर डीएलसच्या नियमानुसार पंजाबने कोलकाताचा सात धावांनी पराभव केला.

आंद्रे रसेलची स्फोटक फलंदाजी, पाहा व्हिडीओ

कोलकाताचे फलंदाज बाद होण्याचे सत्र सुरु असतानाच आंदे रसली मैदानात एन्ट्री झाली अन् चौकार षटकारांचा पाऊस पडला. रसलने ३ चौकार आणि २ षटकार ठोकत १९ चेंडूत ३५ धावा कुटल्या. रसेलने आजच्या सामन्यात ३५ धावा करत केकेआरसाठी दोन हजार धावा पूर्ण केल्या. रसलच्या आक्रमक फलंदाजीचा व्हिडीओ आयपीएलच्या ट्वीटर हॅंडलवर शेअर करण्यात आला आहे.

नक्की वाचा – PBKS vs KKR: पन्नाशीच्या शिखरावर असताना वरुण चक्रवर्तीनं धवनला गुंडाळलं, ‘त्या’ षटकात उडवला त्रिफळा, पाहा Video

इथे पाहा व्हिडीओ

दरम्यान, पंजाब किंग्जसाठी सलामीला मैदानात उतरलेल्या प्रभसिमरन सिंगने सुरुवातीच्या षटकांमध्ये चौफेर फटकेबाजी केली. सिंगने दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने १२ चेंडूत २३ धावांची खेळी केली. परंतु, टीम साऊदीने सिंगला २३ धावांवर असताना झेलबाद केलं आणि पंजाबला पहिला धक्का दिला. पण त्यानंतर भानुका राजपक्षेने आक्रमक खेळी करत पॉवर प्ले मध्ये पंजाबला ५० धावांपर्यंत पोहोचवलं. त्यानंतरही भानुकाने मोठे फटके मारत ३२ चेंडूत ५० धावांची अर्धशतकी खेळी केली. मात्र, उमेश यादवच्या गोलंदाजीवर राजपक्षे ५० धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर शिखर धवन आणि जितेश शर्माने पंजाबची कमान सांभाळली.

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-04-2023 at 20:11 IST

संबंधित बातम्या