Mumbai Indians Ashwani Kumar IPL Record: मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी घरच्या मैदानावरील केकेआरविरूद्धच्या सामन्यात धुमाकूळ घातला. मुंबई इंडियन्सने कोलकाता संघाला ११६ धावांवर सर्वबाद केलं. या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून अश्वनी कुमार या नव्या गोलंदाजाने पदार्पण केले आणि पदार्पणातच त्याने वादळी कामगिरी करत ४ विकेट्स आपल्या नावे केले. अश्वनी कुमारने आयपीएलमधील त्याच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेत आपल्या गोलंदाजीचा प्रत्यय दिला. यासह त्याने अनोखा विक्रम आपल्या नावे केला आहे.

अश्वनी कुमारने दीपक चहरच्या गोलंदाजीवर क्विंटन डी-कॉकची विकेट घेत आपला परिचय करून दिला. यानंतर त्याला पॉवरप्लेमध्ये पहिले षटक टाकण्याची मोठी जबाबदारी दिली. अश्वनीने या पहिल्याच चेंडूवर अजिंक्य रहाणेला झेलबाद करत दणक्यात सुरूवात केली. यानंतर त्याने स्पेलमधील पुढच्या षटकात दोन मोठ्या विकेट्स घेतल्या. त्याने आधी रिंकू सिंगला झेलबाद केलं, त्यानंतर मनिष पांडेला त्याच षटकात क्लीन बोल्ड केलं. यानंतर त्याने स्पेलमधील पुढच्या षटकात आंद्र रसेलला क्लीन बोल्ड करत केकेआरच्या आशांवर पाणी फेरलं.

अश्वनीने त्याच्या पदार्पणाच्या सामन्यात केकेआरच्या मोठ्या विकेट्स आपल्या नावे केला. अश्वनीने त्याच्या स्पेलमधील ३ षटकांत ८ च्या इकॉनॉमीने २४ धावा करत ४ विकेट्स घेतल्या आणि इतिहास घडवला.

मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज अश्वनी कुमार इंडियन प्रीमियर लीगमध्ये पदार्पणात तीनपेक्षा जास्त विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला. त्याने पदार्पणात ४ विकेट्स घेतल्या आहेत. पंजाबच्या २३ वर्षीय गोलंदाजाने वानखेडे स्टेडियमवर आपल्या भेदक गोलंदाजीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
Mumbai Indians Debutant Ashwani Kumar
अश्वनी कुमार मुंबई इंडियन्सचा गोलंदाज

आयपीएल पदार्पणात सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज (MOST WICKETS ON IPL DEBUT FOR BOWLERS

अल्झारी जोसेफ (मुंबई इंडियन्स) विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद – १२ धावांत ६ विकेट
अँड्र्यू टाय (गुजरात लायन्स) विरुद्ध आरपीएस – १७ धावांत ५ विकेट
शोएब अख्तर (केकेआर) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स – ११ धावांत ४ विकेट
अश्वनी कुमार (मुंबई इंडियन्स) विरुद्ध केकेआर – २४ धावांत ४ विकेट