टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज आणि आयपीएलमध्ये दोन वेळा ‘पर्पल कॅप’ विजेता ठरलेल्या भुवनेश्वर कुमारने आज (रविवार) एक नवा इतिहास रचला. पंजाब किंग्ज विरुद्ध गोलंदाजी करताना ४ षटकात २२ धावा देऊन तीन विकेट घेतल्या आणि याच बरोबर त्याच्या नावाची आयपीएलच्या रेकॉर्ड बुकमध्ये सर्वात यशस्वी भारतीय वेगवान गोलंदाज म्हणून नोंदवले गेले. कारण, आता भुवनेश्वर आयपीएलमध्ये १५० पेक्षा जास्त बळी घेणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे.

आयपीएलमधील १३८ वा सामना खेळताना भुवनेश्वरने ही कामगिरी केली आहे. पंजाब किंग्जविरुद्ध तिसरी विकेट घेताच भुवनेश्वरने १५० विकेटचा टप्पा गाठला.

१५० पेक्षा अधिक बळी घेणारा भुवनेश्वर जगातील तिसरा वेगवान गोलंदाज –

आयपीएलमध्ये १५० किंवा त्याहून अधिक बळी घेणारा भुवनेश्वर हा सर्व देशांच्या गोलंदाजांपैकी सातवा आणि भारताचा पाचवा गोलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी ड्वेन ब्राव्हो (१७४), लसिथ मलिंगा (१७०), अमित मिश्रा (१६६), पियुष चावला (१५७), यजुवेंद्र चहल (१५१) आणि हरभजन सिंग (१५०) यांनी ही कामगिरी केली आहे. भुवी हा आयपीएलमध्ये १५० विकेट घेणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज आहे. तर, जसप्रित बुमराह १३४ विकेट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. आयपीएलमध्ये १५० हून अधिक बळी घेणारा भुवनेश्वर हा जगातील तिसरा वेगवान गोलंदाज ठरला आहे. चालू मोसमात यजुवेंद्र चहलनेही आयपीएलमध्ये १५० विकेट्स पूर्ण केल्या आहेत.

पॉवरप्लेमध्येही सर्वाधिक विकेट्स विक्रम –

या सामन्यादरम्यान भुवनेश्वर कुमारने आयपीएलमध्ये पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम देखील केला. पॉवरप्लेमध्ये त्याच्या नावावर एकूण ५४ विकेट्स आहेत. त्याने या प्रकरात झहीर खान आणि संदीप शर्मा यांना मागे टाकले. पॉवरप्लेमध्ये गोलंदाजी करताना दोन्ही खेळाडूंनी ५२-५२ विकेट घेतलेल्य आहेत.

सहा सामन्यात आठ विकेट –

भुवनेश्वर कुमारने चालू हंगामात चमकदार कामगिरी केली आहे. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या ६ सामन्यांच्या ६ डावात गोलंदाजी करताना भुवीने २३.२५ च्या सरासरीने आणि ७.७५ च्या इकॉनॉमीने ८ बळी घेतले आहेत. उमरान मलिकनंतर तो हैदराबादचा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. २२ धावांत ३ बळी ही त्याची चालू मोसमातील सर्वोत्तम कामगिरी आहे.

IPL 2022, PBKS vs SRH : हैदराबादचा पंजाबवर सात गडी राखून दणदणीत विजय, उमरान मलिक ठरला ‘किंग’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील २८ व्या सामन्यात पंजाब आणि हैदराबाद यांच्यात लढत झाली. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने पंजाब किंग्जवर सात गडी राखून विजय मिळवला. पंजाबने दिलेले १५१ धावांचे लक्ष्य हैदराबादने एक षटक आणि एक चेंडू राखून गाठले. हैदराबादच्या ऐडन मरकराम आणि निकोलस पूरन या जोडीने नाबाद खेळी करुन संघाला विजय मिळवून दिला. दुसरीकडे पंजाबला मोठ्या धावसंख्येपर्यंत घेऊन जाण्यासाठी लियाम लिव्हिंगस्टोनने ६० धावांची अर्धशतकी खेळी केली. मात्र त्याची मेहनतीला यश आले नाही.