Flying Kite In The Stadium Video Viral : आयपीएल २०२३ च्या १६ व्या सीजनमधील लीग सामन्यांचा थरार संपला असून चाहत्यांना आता प्ले ऑफ मध्ये खेळवण्यात येणारे सामने पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. लीग स्टेजमध्ये झालेले अनेक रंगतदार सामने प्रेक्षकांना पाहायला मिळाले. याचदरम्यान अनेक खेळाडूंनी चमकदार कामगिरी करून मैदानात छाप सोडली. या हंगामातही संघांना त्यांच्या चाहत्यांकडून जबरदस्त सपोर्ट मिळाला आणि खेळाडूंचा उत्साह वाढला. हे सामने सुरु असताना काही चाहत्यांचे भन्नाट कृत्यही सोशल मीडियावर समोर येत असतात. अशाच प्रकारच्या एका क्रिकेटप्रेमीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एका लाईव्ह सामन्यात त्याने पतंग उडवल्याचं व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे.

हा व्हिडीओ टुर्नामेंटच्या ६७ व्या सामन्यातील आहे. हा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळवला गेला होता. अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या या सामन्यात घरेलू संघाचा ७७ धावांनी पराभव झाला होता. सामन्यादरम्यान दिल्लीचा संघ जेव्हा फलंदाजी करत होता, तेव्हा स्टेडियममधून एक व्यक्ती पतंग उडवून प्रेक्षकांचं मनोरंजन करत होता. हा संपूर्ण मजेशीर प्रकार इतर प्रेक्षकांनी कॅमेरात कैद केला आणि व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला.

नक्की वाचा – “कोहली नाही फक्त शुबमन गिलचं कौतुक…”, सौरव गांगुलीच्या ट्वीटमुळं चाहते भडकले, म्हणाले, “दादा शर्ट काढला म्हणून…”

इथे पाहा व्हिडीओ

या सामन्यात एम एस धोनीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या चेन्नईच्या संघाने प्रथम फलंदाजी करून ऋतुराज गायकवाड (७९) आणि डेवॉन कॉनवे (८७) धावांची अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे चेन्नईने २० षटकात ३ विकेट्स गमावत २२३ धावा केल्या होत्या. त्यानंतर प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने २० षटकात ९ विकेट्स गमावत १४६ धावांची खेळी केली. त्यामुळे दिल्लीचा या सामन्यातही पराभव झाल्याने त्यांना लीगमध्ये नऊवेळा पराभव पत्करावा लागला.