IPL 2025 KKR vs CSK Highlights in Marathi: धोनीचा षटकार अन् अंशुल कंबोजचा चौकारासह चेन्नईने यंदाच्या मोसमातील तिसरा विजय मिळवला. आयपीएल २०२५ मधून बाहेर झालेल्या चेन्नई सुपर किंग्स संघाने केकेआरचा २ विकेट्सने पराभव करत कोलकाताला जवळपास स्पर्धेतून बाहेर केलं आहे. चेन्नईचा पराभवाचा सिलसिला थांबवत अखेरीस विजय नोंदवला आहे. चेन्नईच्या या विजयाचे हिरो नूर अहमद आणि डेवाल्ड ब्रेविस ठरले.
केकेआरने दिलेल्या १८० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईची सुरूवात खूपच खराब झाली. चेन्नईचे दोन्ही सलामीवीर आयुष म्हात्रे आणि डेव्हॉन कॉन्वे डकवर बाद झाले. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या उर्विल पटेलने वादळी सुरूवात केली. उर्विल पटेल ११ चेंडूत १ चौकार आणि ४ षटकारांसह ३१ धावांची झटपट खेळी करत बाद झाला. याशिवाय डेवाल्ड ब्रेविसने पहिलं अर्धशतक झळकावत शानदार खेळी केली. ब्रेविसने वैभव अरोराच्या एका षटकात चौकार-षटकारांचा पाऊस पाडत ३० धावा कुटल्या. यासह ब्रेविसने २५ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांसह ५२ धावांची खेळी केली.
ब्रेविसनंतर धोनी आणि शिवम दुबेने ४३ धावांची सावध भागीदारी करत संघाला विजय मिळवून देण्यात भूमिका बजावली. शिवम दुबेचे अर्धशतक हुकले असले तरी त्याने ४० चेंडूत २ चौकार आणि ३ षटकारांसह ४५ धावा केल्या. तर धोनीने एका षटकारासह १७ धावांची खेळी केली. तर अंशुल कंबोजने एक चौकारासह संघाला दोन चेंडू शिल्लक ठेवत विजय मिळवून दिला. केकेआरकडून वैभव अरोराने सर्वाधिक ३ विकेट्स घेतले पण त्याची सर्वाधिक धुलाई चेन्नईच्या फलंदाजांनी केली. याशिवाय हर्षित राणा आणि चक्रवर्तीने २-२ विकेट तर मोईन अलीने १ विकेट घेतली.
प्रथम फलंदाजीला उतरलेल्या केकेआरची सुरूवातही खराब झाली. दुसऱ्या षटकात पहिली विकेट गमावल्यानंतर, सुनील नरेन आणि कर्णधार अजिंक्य रहाणे यांनी एक मजबूत भागीदारी रचली आणि संघाचा डाव सावरला. संघाने झटपट १०३ धावांपर्यंत आणखी ३ विकेट गमावल्या. दरम्यान आंद्रे रसेल आला आणि त्याने काही मोठे फटके खेळून संघाला १७९ धावांच्या सामन्याच्या योग्य धावसंख्येपर्यंत पोहोचवले.

मनीष पांडेने २८ चेंडूत ३६ धावांची नाबाद खेळी केली, ज्यामुळे संघाला मोठी धावसंख्या गाठता आली नाही. चेन्नईकडून युवा फिरकी गोलंदाज नूर अहमद सर्वात प्रभावी ठरला, त्याने ३१ धावांत ४ विकेट घेतले.