आयपीएलच्या पंधाराव्या हंगामाला सुरुवात झाली आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात या हंगामातील पहिला सामना रंगला. या रोमहर्षक लढतीमध्ये चेन्नईच्या फलंदाजांनी निराशाजनक कामिगिरी केली. मात्र माही अर्थात महेंद्रसिंह धोनीने आयपीएलमध्ये एक नावा इतिहास रचला आहे. धोनी आयपीएलमध्ये पन्नास धावा म्हणजेच अर्धशतक करणारा सर्वात जास्त वय असलेला भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.

धोनीच्या नावावर नवा विक्रम

धोनीने चेन्नईच्या कर्णधारपदाचा कारभार रविंद्र जाडेजाकडे दिलाय. कर्णधारपद नसल्यामुळे धोनी आयपीएलमध्ये यापुढे उत्स्फूर्तपणे खेळेल असा अंदाज बांधला जात होता. हा अंदाज चेन्नईच्या पहिल्याच सामन्यात खरा ठरला. संघ संकटात असताना धोनीने धडाकेबाज कामगिरी करत ३८ चेंडूंमध्ये अर्धशतकी खेळ केला. यासोबतच धोनी आयपीएलच्या इतिहासात अर्धशतक करणारा सर्वात जास्त वय असणारा भारतीय खेळाडू ठऱला आहे. त्याने ३९ चेंडूंमध्ये ७ चैकार आणि एका षटकाराच्या जोरावर ५० धावा केल्या आहेत.

चेन्नईचे ६१ धावांमध्ये ५ गडी बाद

मागील हंगामात ऑरेंज कॅप मिळवणारा ऋतुराज गायकवाड पहिल्याच षटकात शून्यावर बाद झाला. त्यानंतर चेन्नईचा कोणताही फलंजाद मैदानावर जास्त वेळ तग धरू शकला नाही. ऋतुराजनंतर ड्वेन ब्रव्होच्या रुपात चेन्नईला २८ धावांवर दुसरा झटका बसला. त्यानंतर रॉबिन उथप्पाने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र मैदानावर लय सापडण्याआधीच उथप्पाला वरुण चक्रवर्तीने २८ धावांवर बाद केले. त्यानंतर ६१ धावा होईपर्यंत चेन्नईचे पाच गडी बाद झाले. अंबाती रायडू १५ धावांवर बाद झाला. तर शिवम दुबे अवघा ३ धावा करुन तंबूत परतला.

धोनीने संघाला सावरलं

त्यानंतर मात्र रविंद्र जाडेजा आणि महेंद्रसिंह धोनीने चांगला खेळ करत संघाला सावरलं. धोनीने मोठे फटके लगावत ३८ चेंडूंमध्ये ७ चौकार तर एका षटकाराच्या जोरावर ५० धावा केल्या. तर रविंद्र जाडेजाने २८ चेंडूंमध्ये २६ धावा करत धोनीला साथ दिली. या दोघांनी ७० धावांची भागिदारी करत संघाला संघाचा धावफलक १३१ धावापर्यंत पोहोचवला.