DC vs SRH Jake Fraser McGurk Catch Video IPL 2025: दिल्ली कॅपिटल्स संघाने सनरायझर्स हैदराबादचा ७ विकेट्सने पराभव केला. दिल्लीच्या संघाने या सामन्यात उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा नमुना सादर केला. दिल्लीच्या खेळाडूंनी मैदानावर कमालीची चपळाई दाखवत ४ अप्रतिम झेल घेतले. मात्र यापैकी जेक फ्रेझर मॅकगर्कने सीमारेषेवर जबरदस्त झेल घेऊन सर्वांचं लक्ष वेधलं. डीप मिड-विकेटवर त्याने अनिकेत वर्माचा अप्रतिम झेल घेतला, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

सनरायझर्स हैदराबादचा उजव्या हाताचा फलंदाज अनिकेत वर्मा दिल्लीविरुद्ध जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत होता. हैदराबादचे एकामागून एक विकेट गमावलेले असतानाही अनिकेत चौकार-षटकारांचा पाऊस पाडत वादळी फटकेबाजी करत होता. अनिकेत १६व्या षटकातही अनिकेत मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न करत होता आणि त्याने कुलदीप यादवच्या ६व्या चेंडूवर षटकार लगावलाच होता, पण मॅकगर्कने तसं होऊ दिलं नाही.

अनिकेतने फटका मारलेला चेंडू झपाट्याने सीमारेषेकडे जात होता, पण जेक फ्रेझर-मॅकगर्कने हवेत उंच उडी घेत चेंडू सीमारेषेपर्यंत जाण्यापूर्वीच पकडला. हा झेल घेताना उडी मारण्याची त्याची वेळ महत्त्वाची होती. जर त्याने ती उडी योग्य वेळी घेतली नसती तर चेंडू षटकारासाठी जाण्याची खात्री होती. पण मॅकगर्कने कमालीचा टायमिंगने झेल टिपला.

जेक फ्रेझर मॅकगर्क व्यतिरिक्त दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेल, गेल्या सामन्यात दिल्लीसाठी हिरो ठरलेला अष्टपैलू विपराज निगम आणि उपकर्णधार फाफ डू प्लेसिसने यांनीही अप्रतिम झेल घेतले. १९व्या षटकात मिचेल स्टार्कच्या चेंडूवर अक्षरने हर्षल पटेलचा अप्रतिम झेल घेतला. मिडऑफला तैनात असलेल्या दिल्लीच्या कर्णधाराने धावत डावीकडे डाईव्ह करत दोन्ही हातांनी चेंडू पकडला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१९व्या षटकात ४० वर्षीय फाफ डू प्लेसिसने एक्स्ट्रा कव्हरवर विआन मुल्डरचा झेल घेत सर्वांनाच चकित केले. तत्पूर्वी, ११व्या षटकात मोहित शर्माच्या चेंडूवर हेनरिक क्लासेनचा आश्चर्यकारक झेल घेत विपराजने अनिकेत वर्माबरोबरची ७७ धावांची भागीदारी तोडली. यासह दिल्लीने हैदराबादला १६३ धावांवर सर्वबाद केले आणि प्रत्युत्तरात दिल्लीने २५ चेंडू राखून ७ विकेट्सने विजय मिळवला.