Mohammad Amir says Virat is the only king of cricket: आयपीएल २०२३ मधील ६५ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद संघात खेळला गेला. या सामन्यात आरसीबीने विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर ८ गडी राखून विजय मिळवला. स्टार खेळाडू विराट कोहलीने या शतकासह आयपीएलमध्ये सहावे शतकं झळकावण्याचा विक्रम केला आहे. कोहलीच्या या धमाकेदार खेळीने सर्वांचीच मनं जिंकली. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद अमीरने सोशल मीडियावर कोहलीचे कौतुक केले आहे. त्याने कोहलीला खरा किंग म्हटले आहे.

मोहम्मद आमिरने विराट कोहलीचे कौतुक केले –

विराट कोहलीने गुरुवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध शतक झळकावले. विराटने ६३ चेंडूत १०० धावा केल्या. या खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्लेऑफच्या शर्यतीत अजून कायम आहे. अशा परिस्थितीत विराट कोहली कोहलीचे कौतुक करताना मोहम्मद आमिरने सोशल मीडियावर लिहिले की, “क्रिकेटच्या एकमेव किंगने काय इनिंग खेळली आहे.”

IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: लवकरच सगळेजण हार्दिक पंड्याचे गोडवे गातील; कायरॉन पोलार्ड हार्दिकच्या मागे भक्कम उभा
Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव
Shikhar Dhawan and Shubman Gill
 IPL 2024, GT vs PBKS: पंजाबच्या फलंदाजांचा कस! आज गुजरात टायटन्सचे आव्हान; गिल, धवनकडे लक्ष
Who is Angkrish Raghuvanshi
IPL 2024 : कोण आहे अंगक्रिश रघुवंशी? ज्याने सुनील नरेनच्या साथीने दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांची केली धुलाई

मोहम्मद आमिर कोहलीला म्हणाला किंग –

मोहम्मद आमिरने त्याच्या यूट्यूब चॅनलवर विराट कोहलीची स्तुती केली आहे. तो म्हणाला की, “विराट कोहलीची कामगिरी अविश्वसनीय आहे. त्याच्या या खेळीचे महत्त्व अधिकच आहे. कारण हा सामना त्याच्या संघासाठी जिंकणे खूप महत्त्वाचे होते. त्याने खेळलेले शॉट्स जबरदस्त होते. म्हणूनच मी त्याचा क्रिकेटच्या दुनियेतील किंग असा उल्लेख केला आहे.”

हेही वाचा – RR vs PBKS: दुसऱ्याच चेंडूवर प्रभसिमरन झाला बाद, ट्रेंट बोल्टने घेतला अप्रतिम झेल, पाहा VIDEO

विराट कोहली महान खेळाडू आहे –

मोहम्मद आमिर इथेच थांबला नाही. कोहली हा मोठा खेळाडू असल्याचे त्याने सांगतले. तो म्हणाला की, अशा परिस्थितीत तो संघासाठी उभा राहणे हे मोठ्या खेळाडूचे लक्षण आहे. जर तो आणखी पाच वर्षे खेळला, तर तो आणखी किती विक्रम करेल हे मला सांगता येणार नाही.” विराटने आपल्या शतकी खेळीत १२ चौकार आणि ४ षटकारांचा पाऊस पाडला.

हेही वाचा – CSK Team: “…तर एमएस धोनी पुढील हंगामात खेळताना दिसेल”; माहीच्या खेळण्याबाबत रॉबिन उथप्पाने सांगितली महत्त्वाची अट

कोहली आणि क्लासेनने मिळून रचला इतिहास –

या सामन्यात विराट कोहलीने हैदराबादविरुद्धच्या दुसऱ्या डावात ६३ चेंडूंमध्ये १०० धावा केल्या, तर हेन्रिक क्लासेनने पहिल्या डावात आरसीबीविरुद्ध ५१ चेंडूंत जोरदार १०४ धावा केल्या. सामन्यात दोन्ही संघांच्या फलंदाजांनी शतकं झळकावण्याची आयपीएलच्या इतिहासातील ही पहिली वेळ होती. यापूर्वी आयपीएल सामन्यांमध्ये दोन शतके झळकावली आहे, परंतु एकाच संघातील खेळाडूंनी हा कारनामा केला होता.