आयपीएलच्या १६व्या हंगामाला शुक्रवारी (३१मार्च) सुरुवात झाली. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर इंडियन प्रीमिअर लीग २०२३ स्पर्धेचा पहिला सामना पार पडला. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात गतविजेत्या गुजरात टायटन्सने चार वेळचा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्जचा पाच गडी राखून पराभव केला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या विजयासह गुजरातने चेन्नईविरुद्धची आपली अपराजित मोहीम सुरू ठेवली. सीएसकेवरचा हा त्याचा सलग तिसरा विजय आहे. आजवर गुजरातचा पराभव झालेला नाही. राशिद खानला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी चेन्नई सुपर किंग्स संघाने फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ७ विकेट्स गमावत १७८ धावा केल्या होत्या. हे आव्हान गुजरातने १९.२ षटकात ५ विकेट्स गमावत १८२ धावा करून पूर्ण केले. तसेच, ५ विकेट्सने स्पर्धेतील पहिला विजय मिळवला. गुजरात टायटन्सने साई सुदर्शनला त्यांचा पहिला इम्पॅक्ट प्लेअर बनवले. केन विल्यमसनची जागा सुदर्शनने घेतली. त्याचा फायदा करत त्याने शुबमन सोबत शानदार अर्धशतकी भागीदारी केली. त्याने १७ चेंडूत २२ धावा केल्या. त्याला राजवर्धन हांगरगेकरने साई सुदर्शनला यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीकरवी झेलबाद केले.

Gujarat Titans vs Punjab Kings Match Highlights in Marathi
PBKS vs GT : गुजरात टायटन्सचा पंजाब किंग्जवर ३ विकेट्सनी विजय, राहुल तेवतिया-साई किशोरचे शानदार प्रदर्शन
Action against Samson for slow over rate
IPL 2024 : गुजरातविरुद्धच्या पराभवानंतर संजू सॅमसनला १२ लाखांचा दंड, जाणून घ्या काय आहे कारण?
Brilliant performances by Sai Sudarshan and Mohit Sharma
GT vs SRH : साई-मोहितच्या जोरावर गुजरातचा शानदार विजय, हैदराबादला ७ विकेट्सनी चारली धूळ
Rajasthan Royals Vs Delhi Capitals Match UpdateS
IPL 2024 : राजस्थान रॉयल्सचा सलग दुसरा विजय, रोमहर्षक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा १२ धावांनी पराभव

गतविजेत्या गुजरात टायटन्सने सांघिक खेळ करताना इंडियन प्रीमिअर लीग २०२३ च्या पहिल्या सामन्यात विजय मिळवला. शुबमन गिलच्या अर्धशतकाला इम्पॅक्ट खेळाडू साई सुदर्शन व विजय शंकर यांची साथ मिळाली. राशीद खानने मॅजिकल खेळी करून मॅच फिरवली. शुबमन गिलने १२व्या षटकात आपले अर्धशतक पूर्ण केले. मिचेल सँटनरच्या दुसऱ्या चेंडूवर सिंगल घेत त्याने ५० धावांचा टप्पा गाठला. गुजरातने १२ षटकांत २ बाद १११ धावा केल्या आहेत. शुबमन गिल ३१ चेंडूत ५१ आणि कर्णधार हार्दिक पांड्या ११ चेंडूत ८ धावा करून बाद झाला. जडेजाने अफलातून चेंडूवर त्याला त्रिफळाचीत केले. राजवर्धन हांगरगेकरने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर तुषार देशपांडे, रवींद्र जडेजा यांना प्रत्येकी एक विकेट घेण्यात यश मिळाले.

पुणेकर ऋतुराज गायकवाड इंडियन प्रीमिअर लीग २०२३ स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात चांगलाच चमकला. ऋतुराजने या सामन्यात अर्धशतक करत आयपीएल २०२३ मधील पहिले-वहिले अर्धशतक झळकावण्याचा मान मिळवला. विशेष म्हणजे, अर्धशतक करत तो आयपीएलच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ससाठी पहिले अर्धशतक करणारा तिसरा फलंदाज ठरला. त्याचे शतक देखील होईल असे वाटत होते मात्र तो ५० चेंडूत ९२ धावा करून बाद झाला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगलेल्या या सामन्यात गुजरात टायटन्स संघाचा हार्दिक पांड्या याने नाणेफेक जिंकून चेन्नई सुपर किंग्स संघाला फलंदाजीसाठी पाचारण केले होते. यावेळी चेन्नईची सुरुवात जरा खराब झाली. संघाला १४ धावांवर डेव्हॉन कॉनवेच्या रूपात पहिला झटका बसला. मात्र, सलामीला उतरलेल्या ऋतुराज गायकवाड याने एका बाजूने संघाची खिंड लढवत अर्धशतक पूर्ण केले.

ऋतुराज गायकवाड व्यतिरिक्त इतर कोणताही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. मोईन अलीने २३ धावांची खेळी केली, तर धोनीने अखेरच्या षटकात एक चौकार आणि एक षटकार ठोकत संघाची धावसंख्या सात बाद १७८ पर्यंत नेली. त्याने सात चेंडूत नाबाद १४ धावा केल्या. गुजरातकडून राशिद खान, अलझारी जोसेफ आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी दोन बळी घेतले. जोशुआ लिटलने एक विकेट घेत त्यांना साथ दिली.

गुजरात संघात अष्टपैलू हार्दिक पांड्या व्यतिरिक्त फलंदाज शुबमन गिल उत्कृष्ट फॉर्मात आहे. फिरकीपटू राशिद खान अशा गोलंदाजांपैकी एक आहे जो आपली लय आणि सातत्य राखतो. अशा परिस्थितीत गुजरात संघाला पराभूत करणे हे सोप नव्हतं. राष्ट्रीय संघाच्या सामन्यांमुळे डेव्हिड मिलर सलामीच्या सामन्यासाठी उपलब्ध नव्हता.