राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएल २०२२ पर्वातील पहिला क्वॉलिफायर सामना खेळवला जातोय. या सामन्यात विजय मिळाला तर थेट अंतिम सामन्यात थडक मारता येईल म्हणून दोन्ही संघ पूर्ण ताकतीने प्रयत्न करत आहेत. १८९ धावांचा पाठलाग करताना गुजरातचा फलंदाज शुभमन गिल तर विचित्र पद्धतीने धावबाद झाला आहे. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न करताना त्याने आपली विकेट गमावली आहे.

हेही वाचा >>> IPL 2022, GT vs RR : जोस बटलरने राजस्थानला सावरलं, गुजरातसमोर १८९ धावांचे लक्ष्य

वृद्धीमान साहा खातं न खोलताच बाद झाला. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी आलेल्या मॅथ्यू वेड आणि सलामीला आलेल्या शुभमन गिल या जोडीने चांगला खेळ केला. मात्र आठव्या षटकामध्ये चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न करताना दोघेही गोंधळले. परिणामी शुभम गिलला धावबाद व्हावं लागलं. शुभमन गिलने २१ चेंडूंमध्ये ३५ धावा केल्या. आपल्या खेळीत त्याने पाच चौकार आणि एक षटकार लगावला. त्याच्या या खेळीमुळेच गुजरात संघ सुरुवातीच्या षटकांत सावरु शकला.

हेही वाचा >>> IPL 2022, GT vs RR : क्वॉलिफायर-१ मध्ये संजू सॅमसनच्या नावावर नवा विक्रम, धोनीला टाकलं मागे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सुरुवातीला फलंदाजीसाठी येत राजस्थानने १८८ धावा केल्या. राजस्थानचा स्टार फलंदाज जोस बटलरने ५६ चेंडूंमध्ये ८९ धावा केल्या. त्याने १२ चौकार आणि दोन षटकार लगावले. तर बटलरला सॅमसनने साथ दिली. सॅमसनने २६ चेंडूंमध्ये ४७ धावा केल्या.