पीटीआय, नवी दिल्ली

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) या विश्वातील सर्वात लोकप्रिय ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या १७व्या हंगामाला आज, शुक्रवारपासून प्रारंभ होणार आहे. ‘आयपीएल’ नामक क्रिकेटोत्सवात यंदा महेंद्रसिंह धोनीची निवृत्ती, विराट कोहलीची जेतेपदाची प्रतीक्षा, जीवघेण्या अपघातातून बचावलेल्या ऋषभ पंतचे पुनरागमन आणि नेतृत्वाच्या जबाबदारीविना खेळणारा रोहित शर्मा याबाबत सर्वाधिक चर्चा अपेक्षित आहे.

Indian Premier League Cricket Mumbai vs Chennai ipl 2024 match sport news
इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट: मुंबई-चेन्नई आमनेसामने! पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांत आज वानखेडेवर होणाऱ्या द्वंद्वात धोनीवर लक्ष
rohit sharma virat kohli
ipl 2024, MI vs RCB: इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट: सलग दुसऱ्या विजयाचे लक्ष्य! मुंबई इंडियन्ससमोर आज वानखेडेवर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचे आव्हान
suryakumar yadav
सूर्यकुमार यादव तंदुरुस्त; दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या सरावात सहभागी
Hardik Pandya Rohit Sharma
हार्दिकचे कर्णधारपद धोक्यात? क्रिकेटवर्तुळात चर्चा; माजी क्रिकेटपटूंमध्ये मतमतांतरे

अनपेक्षित निर्णय घेण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या धोनीने ‘आयपीएल’च्या १७व्या हंगामाच्या पूर्वसंध्येला गुरुवारी चेन्नई सुपर किंग्ज संघाचे कर्णधारपद सोडले. त्यामुळे आज सलामीच्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुविरुद्ध चेन्नईचा संघ सलामीवीर ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळेल. ४२ वर्षीय धोनी अचानक कर्णधारपदावरून पायउतार झाल्याने आता पुन्हा त्याच्या निवृत्तीची चर्चा सुरू झाली आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने गेल्या हंगामात जेतेपद पटकावण्याची किमया साधली होती. आता ऋतुराजला पहिल्या हंगामात चेन्नईला विक्रमी सहावे जेतेपद मिळवून देण्याची संधी आहे.

हेही वाचा >>>सीएसकेचा कर्णधार झाल्यानंतर ऋतुराज गायकवाडची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, “धोनी असताना…”

सलामीला चेन्नईची गाठ कोहलीचा समावेश असलेल्या बंगळूरु संघाशी पडणार आहे. बंगळूरुच्या पुरुष संघाला अद्याप एकदाही ‘आयपीएल’ जिंकता आलेले नाही. बंगळूरुच्या महिला संघाने नुकत्याच झालेल्या महिला प्रीमियर लीगच्या (डब्ल्यूपीएल) दुसऱ्या हंगामाचे जेतेपद पटकावले. आता त्यांच्याकडून प्रेरणा घेत आपला १६ वर्षांपासूनचा ‘आयपीएल’ जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचा बंगळूरुच्या पुरुष संघाचा प्रयत्न असेल. कोहली गेले दोन महिने क्रिकेट खेळलेला नाही. मात्र, आता चेन्नईविरुद्ध दमदार पुनरागमनासाठी तो उत्सुक असेल.

तसेच यंदाच्या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी धोनीइतकीच पंतचीही चर्चा रंगली. डिसेंबर २०२२ मध्ये भीषण कार अपघातात गंभीर जखमी झालेल्या पंतला वर्षभराहूनही अधिक काळ क्रिकेट खेळता आलेले नाही. त्याने या काळात खूप मेहनत घेतली आणि आता तो दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज झाला आहे.

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा यंदा ‘आयपीएल’मध्ये नेतृत्वाच्या दडपणाविना खेळणार आहे.  त्यामुळे आता कर्णधार नसताना रोहित केवळ फलंदाज म्हणून कशी कामगिरी करतो याकडे सर्वाची नजर असेल.

सलामीची लढत

’ चेन्नई सुपर किंग्ज वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु

’ वेळ : रात्री ८ वा.

’  थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, जिओ सिनेमा अ‍ॅप.