गेल्या दहा वर्षांपासून आयपीएलने भारतीय क्रीडा रसिकांच्या मनावर आपलं अधिराज्य गाजवलेलं आहे. आयपीएलच्या प्रत्येक सामन्यांना लोकं मैदानात तोबा गर्दी करताता, तर टेलिव्हीजनवरही प्रत्येक सामन्यांना मोठ्या प्रमाणात प्रेक्षकवर्ग मिळत असतो. मात्र ज्या ट्रॉफीसाठी हे ८ संघ एकमेकांविरोधात भिडतात, त्यावर एक संस्कृत वाक्य लिहीलेलं आहे. हे संस्कृत वाक्य डोळ्यांना सहज दिसत नसलं तरीही या वाक्याचा एक मोठा अर्थ आहे.

वैदिक स्कुल या ट्विटर हँडलवर आयपीएलच्या ट्रॉफीवरील या संस्कृत ओळींचा अर्थ सांगण्यात आलेला आहे. “यात्रा प्रतिभा अवसर प्रपोनिथी”, ही संस्कृत गेली अनेक वर्ष आयपीएलच्या ट्रॉफीवर आपलं स्थान टिकवून आहे. या वाक्याचा अर्थ, जिथे तुमच्यातल्या प्रतिभेला संधी मिळते असा होतो.

आतापर्यंत आयपीएलच्या माध्यमातून अनेक तरुण खेळाडूंनी भारतीय संघाची दार खुली झालेली आहेत. मुंबई इंडियन्समधून भारतीय संघात दाखल झालेला हार्दिक पांड्या हा अशाच खेळाडूंमधला एक. यंदाच्या हंगामात मयांक मार्कंडे, दिपक चहर, अंकित राजपूत यासारखे तरुण खेळाडू स्पर्धा गाजवत आहेत. त्यामुळे आगामी काळात या खेळाडूंना त्यांच्या कामगिरीचं फळं मिळतं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.