राजस्थान रॉयल्स विरुद्ध सामन्यात मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी पुन्हा एकदा अष्टपैलू कामगिरी केली आहे. सूर्यकुमार यादवच्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने राजस्थानसमोर विजयासाठी १९४ धावांचं आव्हान ठेवलं. यानंतर धावसंख्येचा पाठलाग करताना मैदानावर उतरलेल्या राजस्थानच्या संघाला पॉवरप्लेच्या षटकांमध्ये लागोपाठ धक्के देत मुंबईने सामन्यावर आपलं वर्चस्व निर्माण केलं.
यशस्वी जैस्वाल, स्टिव्ह स्मिथ आणि संजू सॅमसन यांना लागोपाठ माघारी धाडत मुंबईने राजस्थानला सुरुवातीपासूनच बॅकफूटला ढकललं. संघ संकटात सापडलेला असताना यष्टीरक्षक जोस बटलर आणि महिपाल लोमरोर यांनी भागीदारी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतू राहुल चहरच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात लोमरोर झेलबाद झाला. मुंबईकडून बदली खेळाडू म्हणून मैदानावर आलेल्या अनुकूल रॉयने लोमरोरचा सुरेथ झेल पकडत राजस्थानला आणखी एक धक्का दिला. पाहा अनुकूल रॉयने घेतलेला हा भन्नाट झेल…
फलंदाजीदरम्यान सूर्यकुमार यादवच्या हेल्मेटवर चेंडू आदळल्यामुळे तो क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर आला नाही. त्याच्या जागेवर अनुकूल रॉय बदली खेळाडू म्हणून मैदानावर आला. पॉवरप्लेमध्ये मुंबई इंडियन्सकडून ट्रेंट बोल्टने २ तर जसप्रीत बुमराहने १ बळी घेतला.