आयपीएल २०२२च्या २९ व्या सामन्यात चार वेळा चॅम्पियन ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्जला गुजरात टायटन्सने तीन गडी राखून पराभूत केले आहे. आयपीएलच्या १५ व्या हंगामातील गुजरातचा हा एकूण पाचवा विजय आहे. गुजरातचा संघ पुन्हा एकदा लीग टेबलमध्ये अव्वल स्थानी पोहोचला आहे. मात्र गुजरातच्या विजयानंतरही या संघाचा एक खेळाडू चाहत्यांच्या रोषाचा बळी ठरत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रविवारी गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला. पण चाहते गुजरातचा स्टार अष्टपैलू खेळाडू विजय शंकरला सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत. खरं तर, विजय शंकर या मॅचमध्ये गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये फ्लॉप झाला. त्यानंतर त्याला पुन्हा एकदा चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. या सामन्यातही शंकर मागील सामन्याप्रमाणे खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याच वेळी, त्याने एकही षटक टाकले नाही.

आयपीएल २०२२ मध्ये विजय शंकरच्या सततच्या खराब खेळीनंतर त्याला चाहत्यांनी घेरले आहे. एका युजरने ट्विट करून, तू क्रिकेटर आहेस ना? असे विचारले आहे. त्याचवेळी आणखी एका युजरने प्रश्न उपस्थित केला की विजय शंकरला २०१९ विश्वचषक स्पर्धेत संधी कशी मिळाली? याशिवाय विजय शंकर यांच्याविरोधात अनेक प्रकारचे मीम्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जचाचा पराभव करून आयपीएलच्या १५व्या मोसमातील पाचवा विजय नोंदवला. चेन्नई विरुद्धच्या रोमांचक सामन्यात गुजरातने तीन गडी राखून विजय मिळवला. गुजरातकडून डेव्हिड मिलरने सर्वाधिक नाबाद ९४ धावांची खेळी खेळली. त्याचवेळी राशिद खाननेही ४० धावा केल्या. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जने २० षटकात पाच गडी गमावून १६९ धावा केल्या. गुजरातने १७० धावांचा पाठलाग करताना सात गडी गमावून विजय मिळवला.

गुजरातला सामना जिंकण्यासाठी शेवटच्या सात षटकात ९० धावांची गरज होती आणि संघासाठी ते कठीण दिसत होते. पण ‘किलर मिलर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डेव्हिड मिलरचा हेतू वेगळा होता. मिलरने कर्णधार राशिद खानच्या साथीने अवघ्या ३७ चेंडूत ७० धावांची धमाकेदार भागीदारी करत चेन्नईकडून विजय खेचत आणला. ख्रिस जॉर्डनने टाकलेल्या डावातील १८व्या षटकात राशिदने २५ धावा केल्या, जो सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला. मिलरनेही नंतर कबूल केले की हे षटक सामन्याचा टर्निंग पॉइंट होता.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2022 gt vs csk fans are furious with gujarat titans player vijay shankar after a series of poor performances abn
First published on: 18-04-2022 at 14:11 IST