आयपीएल २०२२ च्या ४३ व्या सामन्यात गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सहा गडी राखून पराभव केला. याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा यष्टिरक्षक अनुज रावतने मोठी चूक केली, ज्याचा फायदा शुभमन गिलला झाला. या सामन्यात दिनेश कार्तिक विकेटकीपिंगला आला नाही. कारण उष्णतेमुळे त्याची प्रकृती खालावली होती. अशा स्थितीत अनुज रावतने विकेटकीपिंग केली, पण त्याच्याकडून मोठी चूक झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सामन्यादरम्यान एक क्षण असा आला जेव्हा क्षेत्ररक्षण करत असलेला विराट कोहली मैदानावरील पंचांना प्रश्न विचारण्यासाठी पोहोचला. यष्टिरक्षकाच्या चुकीमुळे अंपायरने नो-बॉल दिला आणि नाबाद देण्यात आले.

गुजरात टायटन्सच्या डावातील नवव्या षटकात शाहबाज अहमद गुजरातकडून गोलंदाजी करत असताना चौथ्या चेंडूवर शुभमन गिल स्ट्राइकवर होता. त्याच्या बॅटजवळून चेंडू गेला आला आणि यष्टिरक्षक अनुज रावतच्या ग्लोव्हजमध्ये गेला. अपील केल्यानंतर अंपायने तो आऊट दिल्यानंतर शुभमन गिलने लगेच रिव्ह्यू घेतला.

रिप्ले पाहिल्यावर चेंडू बॅटला लागला नाही आणि थेट ग्लोव्हजमध्ये गेला. अशा स्थितीत पंच त्याला नॉट-आऊट देणार होते, पण तिसऱ्या अंपायने यष्टिरक्षकाच्या हातमोजेकडे पाहिले तेव्हा तो स्टंपसमोर येत होता. अशा स्थितीत हा चेंडू नो-बॉल घोषित करण्यात आला. नियम असा आहे की जोपर्यंत चेंडू स्टंपच्या रेषेच्या बाहेर जात नाही तोपर्यंत तुम्ही हात पुढे करू शकत नाही.

थर्ड अंपायरने नो बॉल दिल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटले. विराट कोहलीही लगेच मैदानातील अंपायरकडे गेला आणि बोलू लागला. त्याने रागाने विचारले, पण अंपायरने उत्तर दिल्यावर विराट कोहलीही हसला. विराट कोहलीशिवाय यष्टिरक्षक अनुज रावतनेही पंचांकडून नो-बॉलचे कारण जाणून घेतले.

यामुळेच अंपायरने हा चेंडू नो बॉल म्हणून घोषित केला आणि त्यानंतर पुढच्या चेंडूवर शुभमन गिलने ९८ मीटरचा षटकार मारला, कारण हा चेंडू फ्री हिट होता.

दरम्यान, राहुल तेवतिया आणि डेव्हिड मिलरच्या स्फोटक खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्सने पुन्हा एकदा विजय मिळवला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात गुजरातने डेव्हिड मिलर आणि राहुल तेवतिया यांच्या अंतिम खेळीमुळे आश्चर्यकारक कामगिरी केली. शेवटच्या तीन षटकात गुजरातला ३६ धावांची गरज असताना दोघांनीही जोरदार फलंदाजी केली.

गुजरातला शेवटच्या तीन षटकात ३६ धावांची गरज होती. १८व्या षटकात १७ धावा झाल्या, ज्यात एक षटकार आणि दोन चौकारांचा समावेश होता. पण राहुल तेवतिया आणि डेव्हिड मिलरची जादू पुन्हा कामी आली आणि दोघांनी धावांचा पाऊस पाडला. गुजरातला शेवटच्या षटकात फक्त सात धावांची गरज होती.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2022 gt vs rcb anuj rawat wicketkeeping error against gujarat titans abn
First published on: 30-04-2022 at 22:02 IST