रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर मंगळवारी आयपीएल २०२२च्या हंगामातील ३९ वा सामना पार पडला. सामन्यात राजस्थानच्या रियान परागने अखेर आयपीएलचे दुसरे अर्धशतक ठोकले. त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध ५६ धावांची नाबाद खेळी खेळली. आयपीएल २०२२ च्या या ३९व्या सामन्यात आपल्या अर्धशतकाच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने २० षटकात १४४ धावा केल्या. परागने डावाच्या शेवटच्या षटकात दोन षटकार आणि एका चौकारासह एकूण १८ धावा केल्या. दरम्यान या सामन्यातील पहिल्या डावानंतर आरसीबीचा गोलंदाज हर्षल पटेल आणि राजस्थानचा फलंदाज रियान पराग यांच्यात वाद झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्याच्या फलंदाजीमुळे आरसीबीचा गोलंदाज हर्षल पटेल नाराज झाला. आणि या रागाच्या भरात तो मैदानातच रियानशी भिडला. रियानने डावाच्या पाचव्या चेंडूवर युझवेंद्र चहलला एक धाव घेण्यापासून रोखले होते. मग शेवटच्या चेंडूवर त्याने एक लांबलचक षटकार ठोकून आपला निर्णय योग्य असल्याचे दाखवून दिले.

रियान परागने हर्षल पटेलच्या षटकात डावाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार मारला आणि यासह तो डगआउटच्या दिशेने जाऊ लागला. पण हर्षल पटेल काहीतरी बोलला. यानंतर रियान परागने प्रत्युत्तर देताच दोघांमध्ये खडाजंगी झाली. राजस्थान रॉयल्सच्या एका सदस्याने येऊन हस्तक्षेप केला, त्यानंतर प्रकरण मिटले.

विसाव्या षटकातील हर्षल पटेलच्या पहिल्या चेंडूवर रियान परागने एकही धाव घेतली नाही. पण पुढच्या चेंडूवर त्याने चौकार मारला. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर दोन धावा आणि चौथ्या चेंडूवर षटकार खेचून त्याने २९ चेंडूत आयपीएल कारकिर्दीतील दुसरे अर्धशतक पूर्ण केले. पाचव्या चेंडूवर एकही धाव झाली नाही, पण डेथ ओव्हर्स स्पेशालिस्टच्या शेवटच्या चेंडूवर रियान परागने षटकार ठोकला. राजस्थान रॉयल्सने २० षटकांत आठ गडी गमावून १४८ धावा केल्या.

दरम्यान, या संपूर्ण घटनेनंतरही दोन्ही संघाच्या खेळाडूंनी सामना संपल्यानंतर एकमेकांशी हस्तांदोलन केले. मात्र, एक घटना पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. जेव्हा हर्षल पटेलने रियान परागशी हस्तांदोलन केले नाही. पटेलने त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुढे गेल्याचे पाहून परागला आश्चर्य वाटले. परागने हस्तांदोलनासाठी हात पुढे केला पण पटेलने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि यानंतर या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2022 rr vs rcb harshal patel riyan parag fights rajasthan royals innings abn
First published on: 27-04-2022 at 13:57 IST