दिल्ली कॅपिटल्सने शेवटच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा सात धावांनी पराभव केला. या सामन्यात गोलंदाजांनी दिल्लीतर्फे अप्रतिम खेळ केला. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना केवळ १४४ धावा केल्या होत्या. यानंतर दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करत छोट्या धावसंख्येचा बचाव केला. हे खेळाडू दिल्ली संघासाठी सर्वात मोठे मॅचविनर ठरले.

सामन्यानंतर अक्षर पटेलने मुकेश कुमारशी गप्पा मारल्या

दिल्लीने हैदराबादवर विजय मिळविल्यानंतर अक्षर पटेलने मुकेश कुमारची मुलाखत घेतली. त्यांच्यात बराच काळ चर्चा झाली आणि अक्षरने त्याच्या सुधारित कामगिरीबद्दल सांगितले. अक्षर पटेल म्हणाला की, “अलीकडच्या काळात माझ्या यशाचे रहस्य माझी पत्नी ‘मेहा पटेल’ आहे.” त्याने या वर्षाच्या सुरुवातीला आहारतज्ज्ञ असलेल्या मेहासोबत लग्न केले.

अष्टपैलू अक्षर पुढे म्हणाला की, “लेडी लक? होय. लेडी लक हे रहस्य आहे आणि सोबतच माझ्या फलंदाजीच्या क्षमतेवर असणारा विश्वास आहे. कारण, मी गेल्या एका वर्षात ज्या पद्धतीने फलंदाजी केली तोच आत्मविश्वास मी पुढे नेत आहे. आता सर्व काही ठीक चालले असून मला यात सातत्य राखायचे आहे. हाच फॉर्म पुढे न्यायचा आहे. मी नेहमी सकारात्मक असाच विचार करतो. माझी पत्नी एक आहारतज्ज्ञ असून तोही फिटनेसच्या दृष्टीने एक महत्त्वाचा भाग आहे. हासुद्धा एक लेडी लकचाच भाग आहे,” असे अक्षरने मुकेशला सोशल मीडियावरील व्हिडीओमध्ये सांगितले.

अक्षर पटेलने उघड केले की, जेव्हा दिल्ली कॅपिटल्स २ बाद ५७ धावांवर होते तेव्हा तो ड्रेसिंग रूममध्ये कॉफी घेत होता, ज्या वेळी दिल्लीच्या वॉशिंग्टन सुंदरने टाकलेल्या षटकात तीन विकेट्स पडल्या त्या वेळी त्याला कॉफी तशीच सोडून फलंदाजीसाठी यावे लागले. तो म्हणाला, “मी कॉफीची ऑर्डर दिली. मी बॅटिंगला जाण्यापूर्वी मला कॉफी घ्यायला आवडते. मला वाटले अजून वेळ आहे. दोनच विकेट्स पडल्या आहेत, तर तेवढ्या वेळात मी कॉफी घेईन. कॉफी प्यायला सुरुवात केली अन् तेवढ्यात काही खेळाडू धावत आले आणि म्हणाले. ‘भाई, जा. तुमची फलंदाजी करण्याची पाळी आहे.’ ती कॉफीही थंड झाली आणि मला फलंदाजीसाठी  बाहेर जावे लागले.”

हेही वाचा: IPL 2023: “संघात अनेक समस्या आहेत म्हणूनच…”, मोहम्मद कैफने संघ जिंकूनही दिल्ली कॅपिटल्समधील उणीवांवर ठेवलं बोट

पुढे बोलताना पटेल म्हणाला, “मनीष पांडेशी माझे बोलणे झाले. मी त्याला खेळपट्टीबद्दल विचारले. तो म्हणाला की, त्याने फक्त एका चेंडूचा सामना केला आहे. पण खेळायला लागल्यावर समजले की, खेळपट्टी संथ होती. आम्हाला खेळ पुढे न्यायचा होता, त्यात आम्ही भागीदारी करू शकलो. संघाला एका सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले,” अक्षर म्हणाला.

शेवटच्या षटकात सनरायझर्स हैदराबादला विजयासाठी १२ धावांची गरज होती. त्यानंतर कर्णधार डेव्हिड वॉर्नरने मुकेश कुमारकडे चेंडू सोपवला. या षटकात त्याने शानदार गोलंदाजी करत केवळ पाच धावा दिल्या. अशा प्रकारे दिल्ली कॅपिटल्स संघाने सामना सात धावांनी जिंकण्यात यश मिळविले. मुकेश कुमारने तीन षटकांत २७ धावा दिल्या. अखेरच्या षटकात तो दिल्ली संघासाठी तारणहार ठरला आहे.

हेही वाचा: Virat and Anushka: अनुष्का बनली पार्टनर अन् विराट झाला बॅडमिंटन चॅम्पियन!  आयपीएलदरम्यान नवीन प्रयोग करणाऱ्या विरुष्काचा भन्नाट Video व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुकेश कुमार संवाद साधताना म्हणाला, “अशा दबावाच्या परिस्थितीत मी स्वत:ला शांत ठेवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतो. शांत राहिलो की मी माझ्या योजना अधिक चांगल्या प्रकारे अंमलात आणू शकतो. मला वाटतं, तुम्हाला आठवत असेल, जेव्हा आम्ही सराव सामना खेळत होतो, तेव्हा मी तुला गोलंदाजी केली होती. मैदानात थर्टीयार्ड सर्कलच्या बाहेर फक्त चार क्षेत्ररक्षकांसह शेवटच्या षटकात गोलंदाजी करण खूप अवघड असत आणि काल त्याचाच प्रत्यय आला.” मुकेशसोबत विनोद करताना अक्षर पटेल म्हणाला, “मी अशी प्रार्थना करतो की तुम्‍हाला अखेरचे शतक टाकायची वेळ येणार नाही.”