सनरायझर्स हैदराबादचे मुख्य प्रशिक्षक आणि वेस्ट इंडीजचा धडाकेबाज फलंदाज ब्रायन लारा याने कबूल केले की विराट कोहली त्याच्या संघाविरुद्ध सर्वोत्तम क्रिकेट खेळला. तो म्हणाला की, “त्याच्या (हैदराबाद) संघाने घरच्या मैदानावर सातपैकी सहा सामने का गमावले हे आत्ताच सांगणे कठीण आहे, ज्यामुळे त्याची आयपीएल प्लेऑफमध्ये जाण्याची शक्यताही संपुष्टात आली.” कोहलीच्या शतकाच्या जोरावर आरसीबीने सनरायझर्सचा आठ गडी राखून पराभव केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लारा म्हणाला, “आमचे खेळाडू उत्कृष्ट क्रिकेट खेळले पण विराट कोहलीने आमच्याविरुद्ध सर्वोत्तम खेळ केला. फाफ या हंगामात आरसीबीसाठी उत्कृष्ट भूमिका बजावत आहे. त्याच्याकडे आता ऑरेंज कॅप आहे. त्यामुळे आम्ही दोन जागतिक दर्जाच्या खेळाडूंविरुद्ध सामना करत होतो आणि एकंदरीत मला वाटते की आमच्या खेळाडूंचा हा एक चांगला प्रयत्न होता.”

हेही वाचा: Hetmyer vs Curran: पंजाब-राजस्थान सामन्यात सॅम करन, शिमरॉन हेटमायर एकमेकांत भिडले; भर मैदानात घेतला पंगा

कोहलीच्या शतकाची भीती, या दिग्गजाचे मोठे वक्तव्य

१३ सामन्यांमध्ये संघाच्या नवव्या पराभवानंतर लारा म्हणाला, “आमच्या खेळाडूंनी उत्कृष्ट क्रिकेट खेळले, पण विराट कोहलीने आमच्याविरुद्ध सर्वोत्तम खेळ केला. फाफने या संपूर्ण हंगामात आरसीबीसाठी शानदार कॅप्टन्सी केली, त्याने कर्णधार म्हणून संघाला पुढे नेले. त्याच्या नेतृत्त्वाखाली कोहलीने उत्तम भूमिका बजावली. डूप्लेसिसकडे आता ऑरेंज कॅप आहे. मात्र, त्याआधी मला कोहलीच्या फलंदाजीची भीती वाटत होती. नेमकं त्याने शतक मारले आणि माजी भीती खरी ठरली. कोहली हा भारतासाठी मिळालेले रत्न आहे.”

पुढे लारा म्हणाला की, “वेस्ट इंडिजच्या अनुभवी फलंदाजाला सहा घरच्या सामन्यात संघ कसा हरला हे सांगणे कठीण आहे, पण आम्ही सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. घरच्या मैदानावर सातपैकी एकच सामना आम्ही जिंकू शकलो, अशा खराब कामगिरीची आम्हाला अपेक्षा नव्हती, मात्र तसं घडलं आहे. येणाऱ्या हंगामात संघात अधिक बदल होतील, जेणेकरून संघ अधिक मजबूत होईल.”

हेही वाचा: IPL 2023: धोनीचा फिटनेस कसा आहे, तो शेवटची आयपीएल खेळतोय का? चेन्नई सुपर किंग्जच्या प्रशिक्षकाने दिले भन्नाट उत्तर म्हणाला, “त्याचा गुडघा…”

सामन्यात काय झाले?

आधीच स्पर्धेतून बाहेर पडलेल्या सनरायझर्स हैदराबादने हेनरिक क्लासेनच्या शानदार शतकाच्या जोरावर पाच विकेट्सवर १८६ धावा केल्या होत्या. मात्र, भारताचा माजी कर्णधार कोहलीच्या ६३ चेंडूत १०० धावा आणि कर्णधार फाफ डुप्लेसिस (७१) सोबत पहिल्या विकेटसाठी केलेल्या १७२ धावांच्या भागीदारीमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आठ विकेट्स राखून विजय मिळवला.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2023 sunrisers coach brian lara became kohlis fan said virat did the best against hyderabad avw
First published on: 20-05-2023 at 13:23 IST