IPL 2024, Royal Challengers Bengaluru vs Punjab Kings: विराट कोहलीचा भारतात मोठा चाहता वर्ग आहे. किंग कोहलीची एक झलक पाहण्यासाठी चाहते अगदी उत्सुक असतात. असाच काहीसा प्रकार आरसीबी विरुद्ध पंजाब किंग्सच्या चालू सामन्यात घडताना पाहायला मिळाला. विराट कोहली फलंदाजी करत असताना एक चाहता मैदानात घुसला आणि त्याने थेट विराटचे पाय धरले.

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. अखेरच्या षटकात आरसीबीने हा सामना ४ विकेटने जिंकला. मालिकेतील पहिल्या सामन्यात अपयशी ठरलेल्या विराट कोहलीची बॅट चांगलीच तळपली. अर्धशतक झळकावून कोहलीने आपल्या संघाच्या विजयाचा पाया रचला. आरसीबीच्या डावाच्या सुरुवातीलाच हा चाहता मैदानात पोहोचला होता.

Hardik Pandya Slapped With Fine Of 12 Lakh rupees By BCCI
मुंबई इंडियन्सचा विजय सेलिब्रेट करताना हार्दिक पंड्याला धक्का; ‘या’ साठी बीसीसीआयने ठोठावला १२ लाखांचा दंड
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: धोनी कुठल्या दुखापतीसह खेळतोय? मुंबईविरूद्ध सामन्यानंतर सीएसकेच्या एरिक सिमन्स यांचे मोठे वक्तव्य
Andre Russell Closed His Ears as fans cheer when ms dhoni came to bat
IPL 2024: धोनीची एंट्री होताच जल्लोष टिपेला; आंद्रे रसेलने ठेवले कानावर हात- व्हीडिओ व्हायरल
chennai super kings vs kolkata knight riders match preview
IPL 2024 : विजयी पुनरागमनासाठी चेन्नई सुपर किंग्ज उत्सुक! आज अपराजित कोलकाताचे आव्हान; कर्णधारांच्या कामगिरीकडे लक्ष 

चालू सामन्यातच मैदानात पोहोचला कोहलीचा चाहता

पंजाबने दिलेल्या १७७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विराट आणि फॅफ डू प्लेसिस हे सलामीला उतरले. त्याचवेळेस सुरक्षारक्षकांचा डोळा चुकवून विराट कोहलीला भेटायला आलेला चाहता त्याच्या पाया पडला आणि त्याने विराटला मिठी मारली. विरोट कोहलीनेही शांतपणे हे प्रकरण हाताळले. हे दृश्य पाहताच त्याला पकडण्यासाठी सुरक्षारक्षक धावत आले. सुरक्षारक्षक आल्यानंतरही तो चाहता विराट कोहलीला सोडत नव्हता. दुसरा सुरक्षारक्षक आल्यानंतर मोठ्या मेहनतीने त्याला विराटपासून लांब करण्यात यश आले आणि त्यानंतर त्याला मैदानाबाहेर घेऊन गेले.

तत्पूर्वी या सामन्यात खेळताना विराट चांगलाच फॉर्मात दिसला. याशिवाय क्षेत्ररक्षण करताना विराटने २ झेल टिपत एक विक्रम आपल्या नावे केला. विराटने टी-२० फॉरमॅटमध्ये सर्वाधिक झेल टिपण्याच्या शर्यतीत सुरेश रैनाला मागे टाकले. पंजाबचा फलंदाज जॉनी बेयरस्टोचा झेल टिपत विराटने टी-२० फॉरमॅटमधील १७३ कॅचचा आकडा गाठला. त्यानंतर त्याने शिखर धवनचा झेलही टिपला. या यादीत सुरेश रैना १७२ कॅचसह पहिल्या स्थानावर होता आता तो दुसऱ्या स्थानावर आला आहे. तर रोहित शर्मा १६७ कॅचसह तिसऱ्या स्थानी आहे.