आयपीएल २०२५ चा अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. पंजाब किंग्स यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर काहीच वेळात सुरू होणार आहे. या सामन्याची नाणेफेक झाली असून पंजाब किंग्सने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तर आरसीबीचा संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरणार आहे. अंतिम सामन्याची नाणेफेक होण्यापूर्वी आयपीएल २०२५ ची क्लोजिंग सेरेमनी सोहळा पार पाडला. ज्याचे फोटो व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आयपीएलचा यंदा नवा चॅम्पियन संघ क्रिकेटरसिकांना मिळणार आहे. आरसीबी किंवा पंजाबचा संघ गेल्या १८ वर्षांत पहिल्यांदाच ट्रॉफी जिंकणार आहे. यादरम्यान बीसीसीआयने क्लोजिंग सेरेमनीकरता अनोखी रुपरेषा आखली होती.या क्लोजिंग सेरेमनीमध्ये भारतीय लष्कराला मानवंदना देण्यात आली. ऑपरेशन सिंदूर या भारतीय लष्कराच्या यशस्वी मोहिमेला मानवंदना देण्यात आली.

भारतीय सशस्त्र दलांना सलाम करण्यासाठी या खास दिवसाची आयपीएल बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. शंकर महादेवन आणि त्यांचे पुत्र शिवम आणि सिद्धार्थ यांनी अनेक देशभक्तीपर गाणी सादर केली. यादरम्यान संपूर्ण स्टेडियम ‘भारत माता की जय’ ने दुमदुमून गेला. ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर, बीसीसीआयने भारतीय सैन्याला सलामी देण्यासाठी खास तयारी केली होती. यावेळी क्रिकेट चाहते स्टेडियममध्ये भारतीय तिरंगा फडकवताना दिसले आणि आकाशात भारतीय तिरंगा देखील दिसत होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गाणी सुरू असतानाच चार हेलिकॉप्टर उडताना दिसले. सर्वात पुढे भारतीय ध्वज त्यानंतर मागे तीन हेलिकॉप्टर भारताच्या तिन्ही दलांचे ध्वज घेऊन हवेत दिमाखात लहरत जात होते. यानंतर फायटर प्लेनच्या मदतीने आकाशात भारतीय ध्वज तयार केला. या प्रसंगांचे व्हीडिओ व्हायरल होत आहेत.