आयपीएल २०२२ आणि पुढील हंगामासाठी होणाऱ्या मेगा ऑक्शनचे सर्वांना वेध लागले आहे. फ्रेंचायझी कोणत्या संघांना ठेवणार आणि कोणाला संघाबाहेर करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मुंबई इंडियन्सकडून आयपीएल लिलावात हार्दिकला संघाबाहेर केले जाणार आहे. पाच वेळा विजेतेपद पटकावलेल्या मुंबई इंडियन्सने संघात ठेवणाऱ्या खेळाडूंची यादी तयार केली आहे. लखनऊ आणि अहमदाबादच्या आगमनानंतर आयपीएलच्या पुढील हंगामात १० संघ मैदानात उतरतील. या वर्षी डिसेंबरमध्ये मेगा लिलाव होणार आहे. यामध्ये मुंबई इंडियन्सकडून हार्दिकला कायम ठेवण्याची शक्यता कमी आहे.

खेळाडूंना कायम ठेवण्याशी संबंधित एका वरिष्ठ आयपीएल अधिकाऱ्याने वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले, ”मला वाटते की बीसीसीआयकडे राईट-टू-मॅच (RTM) फॉर्म्युलाचा अधिकार असेल. जर RTM नसेल तर ४ खेळाडूंना कायम ठेवण्याची परवानगी दिली जाऊ शकते. रोहित शर्मा आणि भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह ही मुंबईची पहिली पसंती असेल. कायरन पोलार्ड संघाची तिसरी पसंती असेल.” कामगिरीतील सातत्य हे या संघाचे बलस्थान आहे, ज्यामध्ये तिघेही त्यांचे आधारस्तंभ आहेत. मुंबईचा संघ आयपीएल २०२१ मध्ये प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही.

rohit sharma virat kohli
ipl 2024, MI vs RCB: इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट: सलग दुसऱ्या विजयाचे लक्ष्य! मुंबई इंडियन्ससमोर आज वानखेडेवर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचे आव्हान
Mumbai Indians vs Delhi Capitals IPL 2024 Highlights in Marathi
IPL 2024 MI vs DC Highlights: मुंबई इंडियन्सने नोंदवला आयपीएल २०२४ मधील पहिला विजय, दिल्लीवर २९ धावांनी केली मात
Indian Premier League Rajasthan Royals vs Royal Challengers Bangalore
IPL 2024, RCB VS RR: बंगळूरुची कोहलीवर भिस्त
IPL 2024 Gujarat Titans vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024: मुंबई इंडियन्स वि गुजरात टायटन्सच्या सामन्यात चाहते एकमेकांशी भिडले, नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये तुफान हाणामारी; व्हिडिओ व्हायरल

हेही वाचा – सौरव गांगुलीचा राजीनामा..! IPLमधील नव्या संघामुळं घेतला ‘मोठा’ निर्णय

“सध्याच्या परिस्थितीत हार्दिकला संघात कायम ठेवण्याची शक्यता १० टक्क्यांपेक्षा कमी आहे. होय, तो टी-२० विश्वचषकाच्या पुढील काही सामन्यांमध्ये इतरांपेक्षा चांगली कामगिरी करू शकतो, परंतु तरीही संघात त्याच्यासाठी शक्यता कमी आहे. ४ खेळाडू कायम ठेवल्यास किंवा एक RTM असेल, तर सूर्यकुमार यादव आणि इशान किशन हे त्या जागेसाठी मोठे दावेदार असतील”, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

श्रेयस दिल्ली सोडणार?

भारतीय फलंदाज श्रेयस अय्यर दिल्ली कॅपिटल्स सोडू शकतो. तो संघाचे नेतृत्व करण्याच्या भूमिकेसाठी उत्सुक आहे आणि दिल्ली कॅपिटल्स त्याच्याकडे पुन्हा कर्णधारपद सोपवण्याची शक्यता कमी आहे. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील संघाने यंदाच्या आयपीएलच्या प्लेऑफमध्ये स्थान निश्चित केले होते.

सर्व संघांना समान संधी देण्यासाठी, बीसीसीआय दोन नवीन फ्रेंचायझींना लिलावापूर्वी उपलब्ध पूलमधून प्रत्येकी तीन खेळाडू निवडण्याची संधी देण्याचा विचार करत आहे. ”कोअर तयार करण्यासाठी नवीन संघांना संधी दिली जावी, असा यामागील तर्क आहे. साहजिकच, खेळाडूंच्या फीसह तसेच त्या विशिष्ट खेळाडूला लिलावापूर्वी उचलायचे आहे की नाही यासह, पद्धतींवर काम करणे आवश्यक आहे. बहुतेक जुन्या संघांना कायम ठेवण्याचा पर्याय असेल. अशा परिस्थितीत नवीन संघांना ही संधी मिळू शकते”, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.