करोना व्हायरसच्या साथीमुळे अनेक महिन्यांच्या अनिश्चिततेनंतर अखेर आजपासून संयुक्त अरब अमिरातीमध्ये लोकप्रिय इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १३व्या हंगामाला प्रारंभ होत आहे. गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये सलामीचा सामना रंगणार आहे. अबू धाबीच्या स्टेडिअममध्ये हा सामना होईल. या सामान्यात सर्वांचे लक्ष मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आणि चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एम.एस.धोनीच्या कामगिरीकडे असणार आहे.

यंदाच्या आयपीएलबद्दलची उत्सुक्ता मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने इन्स्टाग्रामवरुन शेअर केली आहे. रोहितने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत व सोबत एक कॅप्शन दिले आहे. ‘तयारी पूर्ण झाली, आता अमलबजावणीची वेळ’ असे रोहितने म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

Prep work done. Time for execution @mumbaiindians

A post shared by Rohit Sharma (@rohitsharma45) on

मुंबई इंडियन्सचा संघ आज चेन्नई विरुद्ध पूर्ण आत्मविश्वासाने मैदानात उतरेल. दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या शेवटच्या १० पैकी आठ सामन्यात मुंबईने विजय मिळवला आहे. आतापर्यंत सलामीच्या तीन लढतीपैकी दोनदा मुंबई इंडियन्सने चेन्नईला हरवले आहे. मागच्यावर्षी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने अंतिम सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जवर एका धावेने विजय मिळवला होता.