MS Dhoni With Ziva Singh: आयपीएल २०२३मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आतापर्यंत उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत आहे. धोनीने आतापर्यंत संघासाठी उत्तम फिनिशरची भूमिका बजावली आहे. दरम्यान, महेंद्रसिंग धोनी आपली मुलगी झिवा सिंग धोनीसोबत मैदानावर दिसला. मुलगी झिवा आणि धोनीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत झिवा खूप वेगळी आणि मोठी दिसत आहे.

महेंद्रसिंग धोनीचा हा फोटो चेन्नई सुपर किंग्जच्या अधिकृत सोशल मीडियावरून शेअर करण्यात आला आहे. या छायाचित्रात तुम्ही पाहू शकता की, झिवा वडील धोनीसोबत मैदानाच्या मध्यभागी उभा आहे. हे चित्र सराव दरम्यान घेतले आहे. या छायाचित्रात झिवा टी-शर्ट आणि शॉर्ट्समध्ये दिसत आहे. यासोबतच तिने काळ्या रंगाचे शूजही घातले आहेत. तर धोनी चेन्नईच्या पिवळ्या जर्सीत आहे. चित्रात मागील बाजूस जाळे दिसत आहेत. या फोटोमुळे झिवा सिंग धोनीचा फोटो बऱ्याच दिवसांनी माहीच्या चाहत्यांसमोर आला आहे.

आयपीएल २०२३मध्ये, इंडियन प्रीमियर लीगचा ५४वा सामना चेन्नई येथे चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळवला जाईल. पण या सामन्यापूर्वी महेंद्रसिंग धोनी कर्णधार असलेल्या चेन्नई सुपर किंग्जच्या सराव सत्रादरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे आणि हा व्हिडिओ व्हायरल होण्याचे कारण कोणीही खेळाडू नसून एम.एस. धोनीची मुलगी झिवा आहे.

दिल्लीविरुद्ध जिंकण्यासाठी चेन्नईचे खेळाडू मैदानात घाम गाळत आहेत. संघाचा कर्णधार धोनीनेही सामन्याच्या एक दिवस आधी कसून सराव केला आणि यादरम्यान तो आपल्या मुलीसोबत थोडा वेळ घालवतानाही दिसला. धोनी आणि त्याची मुलगी झिवा धोनी यांचा फोटो चेन्नई सुपर किंग्जने त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे.

धोनीची मुलगी झिवाही तिच्या वडिलांसोबत फुटबॉल खेळताना दिसली. यादरम्यान मुलीची स्टाईल अगदी वडिलांसारखी होती. ही छायाचित्रे पाहून कळते की धोनीप्रमाणेच त्याची मुलगीही मैदानावर आपले १०० टक्के देण्यास नेहमीच तयार असते. तत्पूर्वी, झिवा मुंबई इंडियन्सविरुद्ध चेन्नईच्या सामन्यात वडील धोनी आणि चेन्नई संघाला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचली होती. यावेळी झिवासोबत तिची आई साक्षी धोनीही उपस्थित होती. झिवा आणि साक्षी धोनीचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

हेही वाचा: Wrestlers Protest: “…नाहीतर फाशी द्या” कुस्तीपटू साक्षी मलिकने ब्रिजभूषण यांना आव्हान देत सरकारकडे केली मागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चेन्नई सुपर किंग्जचा संघ १३ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. प्लेऑफच्या जवळ जाण्यासाठी संघ दिल्लीविरुद्ध २ गुण मिळविण्याकडे लक्ष देईल. चेन्नईने आतापर्यंत ११ सामने खेळले आहेत, त्यापैकी ६ जिंकले आहेत. त्याचवेळी त्यांना २०१४ मध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. पावसामुळे एक सामना रद्द करावा लागला.