Irfan Pathan took to Twitter to criticize David Warner: आयपीएल २०२३ मधील १६व्या सामन्यात मुंबईने दिल्लीला त्यांच्या घरच्या मैदानावर ६ विकेट्सने पराभूत केले. हा सामना अतिशय रोमांचक झाला आणि सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर निकाल लागला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने ४७ चेंडूत ५१ धावा केल्या. गेल्या चार आयपीएल सामन्यांमधील त्याचे हे तिसरे अर्धशतक होते. मात्र, भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण त्याच्या अर्धशतकावर खूश नव्हता आणि त्याने वॉर्नरच्या संथ फलंदाजीवर टीका केली. इरफान म्हणाला, वॉर्नरच्या स्ट्राईक रेटकडे कोणीच कसे लक्ष देत नाही. पठाणच्या या ट्विटनंतर चाहते ट्विटरवर एकमेकांना भिडले.

इरफानच्या ट्विटवरून वाद पेटला –

भारताचा माजी दिग्गज अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरच्या मुंबई इंडियन्सविरुद्धच्या ४७ चेंडूत ५१ धावांच्या खेळीवर जोरदार टीका केली. वॉर्नरच्या फलंदाजीवर ट्विटरवर प्रतिक्रिया देताना तो म्हणाला की, ‘वॉर्नर बराच काळ कमी स्ट्राइक रेटने खेळत आहे. त्याच्या स्ट्राईक रेटकडे कुणीच कसं लक्ष देत नाही’. पठाणच्या या ट्विटनंतर ट्विटरवरील युजर्समध्ये युद्ध सुरू झाले. इरफानच्या ट्विटला रिप्लाय देताना अनेक युजर्सनी वॉर्नरला सपोर्ट करत वॉर्नरला दुसऱ्या बाजूने सपोर्ट मिळत नसल्याचे सांगितले. त्याचबरोबर काही यूजर्स इरफान पठाणला पाठिंबा दर्शवताना दिसले.

मुंबईने दिल्लीवर मात केली –

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना १७२ धावा केल्या होत्या प्रत्युत्तरात दिल्लीकडून वॉर्नरने ५१ आणि अक्षर पटेलने ५४ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने शेवटच्या चेंडूवर हा सामना जिंकला. मुंबईकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक ६५ धावांची शानदार खेळी केली. रोहितशिवाय तिलक वर्माने ४१ आणि ईशान किशनने ३१ धावा केल्या.

हेही वाचा – IPL 2023 MI vs DC: ‘अरे बस कर यार…’; तिलक वर्माकडून स्वत:ची स्तुती ऐकून रोहित शर्मा लाजला, पाहा VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चार सामन्यात डेव्हिड वॉर्नरची तीन अर्धशतकं –

डेव्हिड वॉर्नर या आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ४ सामन्यात तीन अर्धशतकांच्या जोरावर २०९ धावा केल्या आहेत. त्याच्या पुढे फक्त शिखर धवन (२२५) आहे. दिल्लीसाठी प्रत्येक सामन्यात धावा करणारा तो एकमेव फलंदाज आहे. अष्टपैलू अक्षर पटेल वगळता या संघातील उर्वरित फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले आहेत. असे असतानाही डेव्हिड वॉर्नरला या टीकेचा सामना करावा लागत आहे.