मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स याच्यातील सामना चांगलाच रोमहर्षक ठरला. या सामन्यात लखनऊचा कर्णधार केएल राहुलने दमदार शतक झळकावले असून मुंबईसमोर विजयासाठी १६९ धावांचे लक्ष्य ठेवले. तर दुसरीकडे मुंबई इंडियन्सची सुरुवात काहीशी खराब झाली. मुंबईचा सलामीवीर इशान किशन विचित्र पद्धतीने झेलबाद झाला.

हेही वाचा >> IPL 2022, LSG vs MI : केएल राहुल पुन्हा तळपला, मुंबईविरोधात खेळताना झळकावले दमदार शतक

लखनऊच्या केएल राहुलने दमदार शतक झळकावले. राहुलच्या या दमदार फलंदाजीमुळे लखनऊने मुंबईसमोर १६९ धावांचे आव्हान उभे केले. या धावांचा पठलाग करताना मुंबईने चांगली सुरुवात केली. सलामीला आलेले रोहित शर्मा आणि इशान किशन चांगल्या गतीने धावा करत होते. मात्र रवी बिश्नोईला ही जोडी तोडण्यात शेवटी यश मिळाले. आठव्या षटकात बिश्नोईने इशान किशनला बाद केलं. इशान किशन विचित्र पद्धतीने झेलबाद झाला.

हेही वाचा >> विराटचा खराब खेळ पाहून माजी क्रिकेटपटूची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला “डोळ्यांतून अश्रू…”

बिश्नोईने टाकलेल्या चेंडूचा सामना करताना इशान किशनने सावध पवित्रा घेतला. मात्र चेंडू बॅटची किनार पकडून यष्टीरक्षकाकडे झेपावला. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात विसावतो असे वाटत असताना चेंडू यष्टीरक्षकाच्या बुटाला लागून थेट स्लीपवर तैनात असलेल्या फलंदाजाच्या हातात गेला. शेवटी इशान किशन नेमका कसा बाद झाला हे पंचानाही न समजल्यामुळे शेवटी थर्ड अंपायरची मदत घेण्यात आली.

हेही वाचा >> मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सने दिल्या खास शुभेच्छा, व्हिडीओ शेअर करत…

थर्ड अंपायरनेही पुन्हा-पुन्हा रिव्ह्यू करत इशान चेंडू खरंच जमिनीवर पडला नाही ना? याची खात्री करुन घेतली. शेवटी थर्ड अंपायरने इशान किशनला झेलबाद म्हणून जाहीर केलं. इशान किशन अवघ्या आठ धावा करून तंबूत परतला.