आयपीएलच्या पंधराव्या हंगामात लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल धमाकेदार फलंदाजी करताना दिसतोय. त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडताना दिसत आहे. मुंबईविरुद्धच्या आजच्या सामन्यातही त्याने धडाकेबाज फलंदाजी करत शतकी केळी खेली आहे. त्याच्या या फलंदाजीमुळे लखनऊने मुंबईसमोर १६९ धावांचे लक्ष्य ठेवले.

हेही वाचा >>> विराटचा खराब खेळ पाहून माजी क्रिकेटपटूची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला “डोळ्यांतून अश्रू…”

सलामीला आलेल्या केएल राहुलने सुरुवातीपासून सावध पवित्रा घेत फलंदाजी केली. क्विंटन डी कॉकसोबत फलंदाजीला येत राहुलने वेळ मिळेल तेव्हा मोठ फटकेबाजीदेखील केली. राहुलने ६२ चेंडूंमध्ये १२ चौकार आणि चार षटकार लगावत नाबाद १०३ धावा केल्या. त्याच्या याच खेळीमुळे लखनऊ संघ १६८ धावा करु शकला. मुंबईला जिंकण्यासाठी आता १६९ धावा कराव्या लागणार आहेत. याआधीही केएल राहुलने मुंबईविरोधात शतक झळकावले होते. या सामन्यात राहुलने ६० चेंडूंमध्ये पाच षटकार आणि ९ चौकार यांच्या मदतीने १०३ धावा केल्या होत्या.

हेही वाचा >>> IPL 2022 : “त्याने फलंदाजीसाठी सलामीला येणं बंद करावं” आरसीबीच्या माजी कर्णधाराचा रोहित शर्माला सल्ला

दरम्यान केएल राहुल वगळता लखनऊचा कोणताही खेळाडू मोठी खेळी करु शकला नाही. मनिष पांड्याने २२ धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या एकाही फलंदाजाला १५ पेक्षा जास्त धावा करता आल्या नाही. सलामीला आलेल्या क्विंटन डी कॉकने १० धावा केल्या. तर दीपक हुडाने दहा आणि आयुष बदोनीने १४ धावा केल्या. मार्कस स्टोईनीस (०), कृणाल पांड्या (१) फलंदाजीमध्ये आपली कमाल दाखवू शकले नाहीत.