scorecardresearch

Jaspirt Bumrah: …तर जसप्रीत बुमराहचं करिअर धोक्यात, दुखापतीबाबत मोठा खुलासा

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला स्ट्रेस फ्रॅक्चर झाल्याने तो गेल्या सहा महिन्यांपासून संघाबाहेर आहे. त्याच्या पुनरागमनाबाबत अद्याप कोणतेही ठोस वृत्त समोर आलेले नाही.

Jasprit Bumrah: Only VVS Laxman will be allowed to talk to Jasprit Bumrah after back surgery reports
संग्रहित छायाचित्र (ट्विटर)

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे बऱ्याच दिवसांपासून संघाबाहेर आहे. त्यामुळे आता बुमराहच्या पाठीच्या दुखापतीबाबत अत्यंत महत्त्वाची शस्त्रक्रिया न्यूझीलंडमध्ये होणार आहे. मात्र यादरम्यान बुमराहच्या शस्त्रक्रियेची माहिती आणि त्यानंतर दुखापतीची माहिती फक्त आणि फक्त एनसीए प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्याकडेच असेल.

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची दुखापत हे सध्या सर्वांसाठीच कोडे आहे. दुखापतीमुळे तो गेल्या सहा महिन्यांपासून संघाबाहेर आहे. प्रत्येक मालिकेसोबत चाहत्यांना आशा आहे की आता बुमराह परतेल पण काहीतरी वेगळंच घडतं. बुमराहच्या दुखापतीवर इतका सस्पेंस निर्माण केला जात आहे की संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनाही त्याच्याबद्दल माहिती नाही. बीसीसीआय बुमराहच्या दुखापतीबाबत कोणतीही माहिती देत ​​नाही.

हेही वाचा: Ravi Shastri: “थोडी प्रतीक्षा करा…”, ICC ट्रॉफी न जिंकल्याबद्दल रवी शास्त्रींचे मोठे विधान; तेंडुलकर-कोहलीचे दिले उदाहरण

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, “भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) जसप्रीत बुमराहकडून नियमित अपडेट मिळवण्यासाठी एकमेव प्रतिनिधी म्हणून व्हीव्हीएस लक्ष्मणची नियुक्ती केली आहे. यानंतर निवडकर्त्यांनाही बुमराहच्या दुखापतीबद्दल माहिती असणार नाही.” जसप्रीत बुमराह शेवटचा २५ सप्टेंबर २०२२ रोजी मैदानात उतरला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या टी२० सामन्यानंतर बुमराहला स्ट्रेस फ्रॅक्चर झाले असून पुढील मालिकेत तो खेळणार नसल्याचे वृत्त आले होते. यावर्षी भारताच्या देशांतर्गत हंगामात तो पुनरागमन करेल अशी अपेक्षा होती पण तसे झाले नाही. त्यानंतर यासंदर्भात अनेक गोष्टी समोर आल्या, मात्र अधिकृतपणे बीसीसीआयने काहीही सांगितले नाही.

बुमराहबद्दल कोणालाही माहिती नाही

बुमराह परत येईपर्यंत बीसीसीआय त्याच्या पुनरागमना संबंधित कोणतेही अपडेट जाहीर करत नाही. या वेगवान गोलंदाजाच्या दुखापतीबाबत गुप्तता ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बीसीसीआयमध्येही याची फारशी माहिती नाही. केवळ राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण आणि फिजिओ यांना बुमराहशी बोलण्याची परवानगी आहे. बुमराहच्या दुखापतीबाबत नंतर अपडेट देण्यात येईल, असेही निवड समितीला स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा: IPL 2023: आयपीएल सुरु होण्याआधीच बेन स्टोक्सचे दाखवले आक्रमक रूप; नेटमध्ये मारले एकापाठोपाठ एक षटकार, Video व्हायरल

बुमराहच्या पुनरागमनाला वेळ लागेल

या महिन्याच्या सुरुवातीला अशी बातमी आली होती की स्ट्रेस फ्रॅक्चरने त्रस्त असलेल्या बुमराहचे ऑपरेशन यशस्वी झाले आहे पण तरीही त्याला परत येण्यास वेळ लागेल. बुमराह जूनमध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये खेळणार नाही. तसेच त्याच्याकडून आशिया कपमध्ये खेळण्याची आशाही कमी आहे. टीम इंडियाचे हा स्टार गोलंदाज कधी मैदानात परतेल हे फक्त बीसीसीआयच सांगेल. बुमराहच्या अनुपस्थितीचे नुकसान टीम इंडिया तसेच या आयपीएलमध्ये आपल्या स्टारशिवाय खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सचे होणार आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-03-2023 at 18:28 IST

संबंधित बातम्या