कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना सुरु आहे. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान नाणेफेकीच्या वेळी समालोचक डॅनी मॉरीसनने गिलला लग्नाबाबत प्रश्न विचारला.
या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सच्या प्लेइंग ११ मध्ये २ बदल केले असल्याची माहिती कर्णधार अजिंक्य रहाणेने दिली. अजिंक्य रहाणेचं बोलून झाल्यानंतर डॅनी मॉरीसनने शुबमन गिलसोबत संवाद साधला. त्यावेळी डॅनी मॉरीसनने त्याला विचारलं की, “तू आज खूप छान दिसतो आहेस. लग्नाच्या तयारीत आहेस का?..” यावर उत्तर देताना गिल म्हणाला, ” नाही, असं काही नाहीये..” या मजेशीर संवादाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
नाणेफेकीच्या वेळी गिल काय म्हणाला?
खेळपट्टीबाबत बोलताना गिल म्हणाला, ” मला वाटतं दव पडणार नाही. आम्ही चांगली धावसंख्या उभी करण्याचा प्रयत्न करू, त्यामुळे सामना आणखी जबरदस्त होईल. आमच्या गोलंदाजांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. प्रत्येक गोलंदाजाला विकेट्स घेण्यात यश आलं आहे. आमचे गोलंदाज सतत विकेट्स घेण्याच्या प्रयत्नात आहेत. आमचे गोलंदाज ज्याप्रकारे चांगली गोलंदाजी करून धावसंख्येवर नियंत्रण ठेवत आहेत, ते खरंच जबरदस्त आहे.”
अजिंक्य रहाणे काय म्हणाला?
रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. नाणेफेकीनंतर तो म्हणाला, “आमच्या संघातील खेळाडू खूप मेहनत घेत आहेत. त्यांनी काही चुका देखील केल्या आहेत. मात्र, आमचं लक्ष सकारात्मकतेवर आहे. सध्या आम्ही सातव्या क्रमांकावर आहोत, आणि प्रत्येकाचा उद्देश संघ म्हणून पुढे जाण्याचा आहे.” या सामन्यासाठी कोलकाताने २ मोठे बदल केले आहेत. गुरबाज आणि मोईन अलीचा प्लेइंग ११ मध्ये समावेश करण्यात आला आहे.
या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:
गुजरात टायटन्स (Playing XI)
साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षक), शेर्फेन रदरफोर्ड, राहुल तेवतिया, वॉशिंग्टन सुंदर, शाहरुख खान, राशिद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज.
कोलकाता नाईट रायडर्स (Playing XI):
रहमानुल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), सुनील नारायण, अजिंक्य रहाणे (कर्णधार), वेंकटेश अय्यर, रिंकू सिंग, मोईन अली, आंद्रे रसेल, रमदीप सिंग, हर्षित राणा, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती.