KL Rahul Shares Photo After Surgery: आयपीएल २०२३ मध्ये लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल दुखापतीमुळे संघाबाहेर गेला होता. यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली आहे. दरम्यान, राहुलने शस्त्रक्रियेनंतरचे त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यात तो बरा होताना दिसत आहे. हे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. चाहतेही त्यावर प्रतिक्रिया देत आहेत.
यादरम्यान केएल राहुलने इंस्टाग्रामवर एक अपडेट देखील दिले की त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे आणि ती यशस्वी झाली आहे. यानंतर, आता त्याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर फोटो शेअर केले आहेत, ज्यात तो बरा झालेला दिसत आहे. त्याने शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये तो वॉकरच्या मदतीने चालताना दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोमध्ये त्याची पत्नी अथिया शेट्टीही त्याच्यासोबत दिसत आहे. यासोबतच त्याने आणखी दोन फोटोही शेअर केले आहेत, ज्यात त्याचा वॉकर आणि आकाश दिसत आहेत.
राहुलच्या या फोटोंवर चाहते जोरदार कमेंट करत आहेत. चाहत्यांनी त्याला लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. चाहते म्हणत आहे की संघात केएल राहुलची उणीव भासत आहे. एका चाहत्याने कमेंट सेक्शनमध्ये लिहिले की, तो नसल्याने संघात कमी जाणवत नाही, पण राहुलने आता आराम करावा आणि बरे होऊन भारतीय संघात परतावे अशी त्याची इच्छा आहे.
खरं तर, १ मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात त्याला दुखापत झाली होती. या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना त्याच्या पायाच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. या दुखापतीनंतर त्याला लगेच मैदानाबाहेर नेण्यात आले. त्यानंतर तो ११व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पुन्हा मैदानात आला होता, मात्र धावा काढण्यासाठी त्याला धावता आले नाही.
केएल राहुलच्या अनुपस्थितीत, क्रुणाल पांड्या सध्या लखनऊ सुपर जायंट्सची कमान सांभाळत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली लखनऊने शनिवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्धचा सामना ७ गडी राखून जिंकला. लखनऊने या आयपीएलमध्ये आतापर्यंत १२ सामने खेळले आहेत, त्यापैकी ६ सामने त्यांनी जिंकले आहेत तर एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे. लखनऊ सध्या १३ गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे.