Liam Livingstone Hits Three Consecutive Sixes Video Viral : आयपीएल २०२३ चा ४६ वा सामना मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात मोहालीच्या बिंद्रा स्टेडियममध्ये होत आहे. मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पंजाब किंग्जच्या गोलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांचा अक्षरक्षा धुव्वा उडवला. मुंबईचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरची १९ व्या षटकात लियाम लिविंगस्टोनने धुलाई केली. जोफ्राच्या षटकातील पहिल्या तीन चेंडूवर लियामने सलग तीन गगनचुंबी षटकार ठोकले. लियामने धावांचा पाऊस पाडत यंदाच्या आयपीएलमध्ये पहिलं अर्धशतक ठोकलं.

जितेश शर्मानेही नाबाद ४९ धावांची खेळी केल्यामुळं पंजाबने २० षटकात ३ विकेट्स गमावत २१४ धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे मुंबई इंडियन्सला विजयासाठी २१५ धावांचं लक्ष्य गाठावं लागणार आहे. परंतु. या इनिंगमध्ये आख्ख्या स्टेडियममध्ये लियामच्या इनिंगची चर्चा रंगली. लियामने ठोकलेल्या षटकार हॅट्रिकचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

नक्की वाचा – …म्हणून विराट कोहली अन् गौतम गंभीर यांच्यात झालं भांडण, मैदानातील संपूर्ण Video आला समोर

इथे पाहा व्हिडीओ

पंजाबसाठी लियाम लिविंगस्टोन आणि जितेश शर्माने शतकी भागिदारी रचली. लियामने ४२ चेंडूत ४ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीनं ८२ धावांची नाबाद खेळी साकारली. तर जितेश शर्माने २७ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीनं ४९ धावांची नाबाद खेळी साकारली. सलामीला आलेला प्रभसिमनर सिंग ९ धावा करून स्वस्तात माघारी परतला. कर्णधार शिखर धवनने २० चेंडूत ३० धावा केल्या. तर मॅथ्यू शॉर्टने २६ चेंडूत २७ धावा केल्या. त्यामुळे पंजाबला २० षटाकांत २०० हून अधिक धावांचा टप्पा गाठता आला. मुंबईसाठी अनुभवी फिरकीपटू पीयुष चावलाने २ विकेट घेतल्या. तर आर्शद खानला एका विकेटवर समाधान मानावं लागलं.