LSG vs RCB, IPL 2025: आयपीएल २०२५ स्पर्धेतील ७० वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासाठी अतिशय महत्वाचा होता. कारण हा सामना जिंकून या संघाला गुणतालिकेत टॉप २ मध्ये प्रवेश करण्याची संधी होती. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने हा सामना जिंकला, पण ऋषभ पंतने या संघाचं टेन्शन वाढवलं होतं. ऋषभ पंतच्या शानदार शतकी खेळीच्या बळावर लखनऊ सुपर जायंट्स संघाने २० षटकांअखेर २२७ धावांचा डोंगर उभारला. या धावा करण्यात ऋषभ पंतने मोलाची भूमिका बजावली. ऋषभने ६१ चेंडूंचा सामना करत नाबाद ११८ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने मोठे रेकॉर्ड मोडून काढले आहेत.

असा रेकॉर्ड करणारा ठरला पहिलाच भारतीय फलंदाज

ऋषभ पंतला या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येण्याची संधी मिळाली. याचा फायदा घेत त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. त्याने या डावात षटकारांचा पाऊस पाडला. यासह तो आयपीएल इतिहासातील सर्वाधिक वेळेस एकाच डावात ८ किंवा त्यापेक्षा अधिक षटकार मारणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. ऋषभने आतापर्यंत ३ वेळेस एकाच डावात ८ पेक्षा अधिक षटकार मारण्याचा कारनामा केला आहे. तर राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार संजू सॅमसनने २ वेळेस हा कारनामा केला आहे.

आयपीएल स्पर्धेतील एकाच डावात सर्वाधिक वेळेस ८ किंवा त्यापेक्षा अधिक षटकार मारणारे फलंदाज

३ वेळेस- ऋषभ पंत<br>२ वेळेस- संजू सॅमसन
२ वेळेस – श्रेयस अय्यर
२ वेळेस – शुबमन गिल
२ वेळेस – विराट कोहली
२ वेळेस- युसूफ पठाण

यासह ऋषभ पंत आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरूद्ध शतकी खेळी करणारा तिसरा कर्णधार आणि दुसरा भारतीय कर्णधार ठरला आहे. याआधी २०२० मध्ये केएल राहुलने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरूद्ध खेळताना नाबाद १३२ धावांची खेळी केली होती. याआधी होती. २०११ मध्ये अॅडम गिलख्रिस्टने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरूद्ध फलंदाजी करताना १०६ धावांची खेळी केली.

यासह ऋषभ पंतने आयपीएल स्पर्धेत यष्टीरक्षक म्हणून सर्वात मोठी खेळी करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत स्थान मिळवलं आहे. या यादीत ब्रेंडन मॅक्कुलम अव्वल स्थानी आहे. त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरूद्ध खेळताना १५८ धावांची खेळी केली होती. याआधी देखील ऋषभने सनरायझर्स हैदराबाद संघाविरूद्ध खेळताना १२८ धावांची खेळी केली होती. आता त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरूद्ध खेळताना नाबाद ११९ धावांची खेळी केली आहे.

आयपीएल स्पर्धेत यष्टीरक्षक म्हणून सर्वात मोठी खेळी करणारे फलंदाज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१५८ धावा – ब्रेंडन मॅक्कुलम विरूद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
१४० धावा- क्विंटन डीकॉक विरूद्ध कोलकात नाईट रायडर्स
१३२ धावा- केएल राहुल विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
१२८ धावा- ऋषभ पंत विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद
११९ धावा – संजू सॅमसन विरूद्ध पंजाब किंग्ज<br>११८ धावा – ऋषभ पंत विरूद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू