गुवाहाटी येथील बारसपारा स्टेडियमवर बुधवारी (५ एप्रिल) राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स असा सामना रंगला. आयपीएल इतिहासात प्रथमच गुवाहाटी येथे सामना खेळला गेला. या सामन्यात पंजाब संघाने पहिल्या सामन्यातील लय कायम राखली. दोन्ही सलामीवीरांनी झळकावलेल्या अर्धशतकांनंतर नॅथन एलिसने तिखट मारा करत राजस्थानच्या फलंदाजांना विजयापासून रोखले. त्याने जॉस बटलरला बाद केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

आयपीएलच्या आठव्या सामन्यात पंजाब किंग्जचा गोलंदाज नॅथन एलिसने त्याच्याच चेंडूवर राजस्थान रॉयल्सचा फलंदाज जॉस बटलरला अप्रतिम झेल घेत बाद केले. तत्पूर्वी, राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने एलिसच्या षटकातील पहिल्या दोन चेंडूंवर चौकार ठोकले. अशा स्थितीत चौथ्या चेंडूवर बटलरची विकेट घेत गोलंदाजाने शानदार पुनरागमन कालच्या सामन्यात केले होते.

Who is fast bowler Sandeep Sharma
IPL 2024 : पाच सामन्यांनंतर परतला आणि मुंबई इंडियन्सच्या डावाला खिंडार पाडणारा संदीप शर्मा कोण?
Ian Bishop on Jasprit Bumrah Fast Bowling PhD
PBKS vs MI : ‘बुमराहला पीएचडी देईन आणि युवा गोलंदाजांसाठी त्याची लेक्चर्स ठेवेन’, वेस्ट इंडिजच्या माजी खेळाडूचं वक्तव्य
IPL 2024 Rajasthan Royals vs Royal Challengers Banglore Match Updates in Marathi
IPL 2024: आधी चहलच्या गोलंदाजीवर लगावला षटकार अन् मग केली थोबाडीत मारण्याची अ‍ॅक्शन, VIDEO होतोय व्हायरल
IPL 2024 Gujarat Titans vs Punjab Kings Match Updates in Marathi
IPL 2024: मुंबईकर शशांक ठरतोय पंजाब किंग्जचा तारणहार, जाणून घ्या त्याची आजवरची वाटचाल

बॅट, पॅड, कॅच अन् जॉस बटलर थेट तंबूत

नॅथन एलिसने ५व्या षटकातील चौथा चेंडू फुल लेंथ स्टंपवर टाकला. बटलरला हा बॉल ऑन-ड्राइव्ह खेळायचा होता, बॅट थोडी वळली आणि चेंडू बॅटची कड घेऊन पॅडला लागला आणि हवेत गेला आणि एलिसने फॉलो-थ्रूवर वेगाने पुढे धाव घेतली आणि हवेत सूर मारत दोन्ही हातांनी एक शानदार झेल घेतला. या सामन्यात बटलरने ११ चेंडूत एका चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १९ धावा केल्या. तो आज तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजीला आला होता जो सर्वांसाठीच आश्चर्याचा धक्का होता. त्याचवेळी एलिसने ११व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर कर्णधार संजू सॅमसनची महत्त्वाची विकेटही घेतली. संजूने २५ चेंडूत ५ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ४२ धावांची खेळी केली.

इतिहासात प्रथमच गुवाहाटी येथे आयपीएल सामना होत असताना प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात सामन्याला गर्दी केली. घरचा संघ म्हणून खेळत असलेल्या राजस्थानच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, पंजाबच्या सलामीवीरांनी हा निर्णय चुकीचा ठरवला. युवा सलामीवीर प्रभसिमरन गिल याने पहिल्या सामन्यातील फलंदाजीप्रमाणेच आक्रमक रूप धारण करत केवळ ३४ चेंडूवर ६० धावा चोपल्या. संघाला १० षटकात ९० धावांची सलामी दिल्यानंतर तो बाद झाला. चौथ्या क्रमांकावरील जितेश शर्मा याने २७ धावा केल्या. दुसरीकडे कर्णधार शिखर धवनने आपल्या कारकिर्दीतील ५०वे आयपीएल अर्धशतक पूर्ण केले. त्याने अखेरपर्यंत नाबाद राहत ५६ चेंडूवर ८६ धावांची खेळी केली.

हेही वाचा: MI vs CSK: माजी चीफ सिलेक्टरच्या ‘सॅल्यूट’वर धोनीची अमेझिंग रिअ‍ॅक्शन, ड्रेसिंग रूममध्ये जाऊन दिला आशीर्वाद, Video व्हायरल

मात्र, शिमरन हेटमायर व ध्रुव जुरेलने करन व अर्शदीप यांच्याविरुद्ध षटकार चौकार लगावत सामना रंगतदार बनवला. अखेरच्या षटकात राजस्थानला विजयासाठी 16 ध वांची गरज होती. मात्र, करनने आपला अनुभव दाखवत पंजाबला विजयीरेषेपार नेले.