IPL 2025 Pat Cummins Record as Captain: सनरायझर्स हैदराबादचा संघ दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध घरच्या मैदानावर करो या मरो सामना खेळत आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असणार आहे. याप्रमाणेच हैदराबादने वादळी सुरूवात करत दिल्लीच्या धावांना ब्रेक लावला आहे. हैदराबादने नाणेेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि पॉवरप्लेमध्ये दिल्लीच्या ४ फलंदाजांना बाद करत माघारी धाडलं. यादरम्यान पॅट कमिन्सने एक अनोखा विक्रम केला आहे.

पॅट कमिन्सने दिल्लीविरूद्ध सामन्यात ३ षटकांत ३ विकेट घेतले आहेत. कर्णधार पॅट कमिन्सने य सामन्यात गोलंदाजीला सुरूवात केली आणि पहिल्याच चेंडूवर नायरला शून्यावर बाद करत संघाला पहिला ब्रेकथ्रू मिळवून दिला. पहिला विक्रम पॅट कमिन्सच्या नावावर हा विकेट घेताच झाला. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारा पॅट कमिन्स सनरायझर्स हैदराबादचा चौथा खेळाडू ठरला. त्याच्या आधी भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी यांनी ही कामगिरी केली आहे.

आयपीएल सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारे सनरायझर्स हैदराबादचे गोलंदाज

जगदीशा सुचित – विराट कोहली (RCB), मुंबई, २०२२
भुवनेश्वर कुमार – प्रभसिमरन सिंग (PBKS), हैदराबाद, २०२३
मोहम्मद शमी – शेख रशीद (सीएसके), चेन्नई, २०२५
पॅट कमिन्स – करुण नायर (डीसी), हैदराबाद, २०२५

पॅट कमिन्सने पॉवरप्लेमध्येच ३ षटकं टाकली. त्याने १२ धावा देऊन ३ विकेट्स घेतल्या. सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे कमिन्स या तिन्ही षटकांच्या पहिल्या चेंडूवर ही विकेट घेतली. करुण नायरनंतर त्याने तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर फाफ डू प्लेसिसला पॅव्हेलियनमध्ये पाठवले, जो ३ धावा करत बाद झाला. पाचव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर कमिन्सने अभिषेक पोरेलला पॅव्हेलियनमध्ये पाठवले आणि तिसरी विकेट मिळवली.

पॅट कमिन्सने पॉवरप्लमध्ये गोलंदाजी करताना ३ विकेट्स घेतले आहेत. याचबरोबर पॅट कमिन्स हा संघाचा कर्णधारदेखील आहे. यासह कर्णधार म्हणून पॉवरप्लेमध्ये गोलंदाजी करताना ३ षटकात ३ विकेट्स घेणारा पहिला कर्णधार ठरला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयपीएलमध्ये पॉवरप्लमध्ये २ पेक्षा जास्त विकेट घेणारे कर्णधार

३/१२ – पॅट कमिन्स (SRH) विरुद्ध DC, हैदराबाद, २०२५
२/१० – अक्षर पटेल (DC) विरुद्ध RCB, दिल्ली, २०२५
२/१३ – झहीर खान (DC) विरुद्ध KKR, दिल्ली, २०१७
२/१३ – शॉन पोलॉक (MI) विरुद्ध KKR, कोलकाता, २००८
२/१४ – झहीर खान (DC) विरुद्ध RPS, पुणे, २०१७
२/१८ – झहीर खान (DC) विरुद्ध KKR, दिल्ली, २०१६
२/१९ – झहीर खान (DC) विरुद्ध RPS, पुणे, २०१७