Punjab Kings 2023: इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) मध्ये पंजाब किंग्जची कामगिरी आतापर्यंत उत्कृष्ट राहिली आहे. पंजाब किंग्सने हंगामाच्या सुरुवातीला तीनपैकी दोन सामने जिंकले आहेत आणि एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान, पंजाब किंग्जच्या काही खेळाडूंचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये पंजाब किंग्जचे खेळाडू पत्ते खेळताना दिसत आहेत.

पंजाब किंग्जचे खेळाडू तीन पत्ती गेम खेळताना पकडले गेले!

सोशल मीडियावर एका व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडिओमध्ये पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवनसोबत राहुल चहर आणि हरप्रीत ब्रार दिसत आहेत. हे तिघे खेळाडू तीन पत्ती हा पत्त्यांचा गेम खेळताना दिसत आहेत. अचानक पोलीस तेथे आल्यावर या सर्व खेळाडूंची तंतरते आणि मग राहुल चहर, हरप्रीत ब्रार तिथून पळताना दिसत आहेत. खरं तर, आम्ही तुम्हाला सांगतो की हे एक इंस्टाग्राम रील आहे जे स्वतः शिखर धवनने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहे. हा मजेशीर व्हिडिओ चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.

शिखर धवनच्या बॅटमधून शानदार खेळी

आयपीएल २०२३ मध्ये पंजाब किंग्जचे कर्णधारपद सांभाळणारा शिखर धवन एक फलंदाज म्हणूनही खूप यशस्वी ठरला आहे. शिखर धवनने आयपीएल २०२३ मध्ये आतापर्यंत सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने तीन सामन्यांत २२५.०० च्या सरासरीने २२५ धावा केल्या आहेत. यादरम्यान शिखर धवनने दोन अर्धशतके झळकावली आहेत. त्याचवेळी, त्याच्या नेतृत्वाखाली त्याने पहिल्या तीनपैकी दोन सामन्यांमध्ये संघाला विजय मिळवून दिला आहे.

हेही वाचा: IPL 2023, MIvsDC: दिल्लीची झोळी रिकामीच! रोहित शर्माच्या तुफानी अर्धशतकाच्या जोरावर मुंबई इंडियन्सचा सहा गडी राखून विजय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंजाब किंग्सचे शानदार प्रदर्शन

कोलकाता नाईट रायडर्स संघाचा पराभव करून पंजाब किंग्जने या मोसमाची सुरुवात केली. त्याचवेळी दुसऱ्या सामन्यात पंजाब किंग्जने राजस्थान रॉयल्स संघाचा पराभव केला. पण हंगामातील त्यांच्या तिसऱ्या सामन्यात पंजाब किंग्जला सनरायझर्स हैदराबादविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. पण या सामन्यातही शिखर धवनने शानदार कामगिरी करत नाबाद ९९ धावा केल्या.