Sandeep Sharma No Ball Viral Video : आयपीएल २०२३ मध्ये एकाहून एक जबरदस्त सामने पाहायला मिळत आहे. राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैद्राबाद यांच्यातही रविवारी श्वास रोखून धरणारा सामना झाला. शेवटच्या चेंडूवर हैद्राबादला विजयासाठी पाच धावांची आवश्यकता असताना संदीप शर्माने नो बॉल फेकला अन् हैद्राबादचा निसटता विजय झाला. कारण हैद्राबादच्या अब्दुल समद संदीप शर्माच्या गोलंदाजीवर बाद झाला होता. परंतु, अंपायरने तो चेंडू नो बॉल असल्याचा निर्णय दिला अन् सामना काही क्षणातच पलटला.

समदने त्यानंतर शेवटच्या चेंडूवर गगनचुंबी षटकार ठोकून हैद्राबादला २१५ धावांचं लक्ष्य गाठून दिलं आणि या सामन्यात एसआरएचचा दणदणीत विजय झाला. संदीप शर्माने फेकलेला नो बॉल अन् त्यानंतर समदने मारलेला विजयी षटकार हे संपूर्ण थरारक दृष्य कॅमेरात कैद झालं असून व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हैद्राबाद कठीण परिस्थितीत असताना फिलिप्सने ७ चेंडूत २७ धावा कुटल्या. तर समदने ७ चेंडूत १७ धावांची नाबाद खेळी केली.

नक्की वाचा – RR vs SRH: संदीप शर्माच्या नो बॉलवर कर्णधार संजू सॅमसनची मोठी प्रतिक्रिया, म्हणाला, “तुम्ही रेषेच्या बाहेर…”

इथे पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सामना संपल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना संजू म्हणाला, “सामना जिंकण्याच्या स्थितीत असताना तुम्ही रेषेच्या बाहेर जाऊन गोलंदाजी करू शकत नाही. समदला बाद केल्यानंतर संदीपने जल्लोष केला पण त्याने फेकलेला चेंडू नो बॉल निघाला आणि राजस्थानला पराभवाला सामोरं जावं लागलं. समदने जीवदान मिळाल्यानंतर षटकार ठोकून हैद्राबादला विजय मिळवून दिला. आयपीएलमध्ये अशा प्रकारचे रंगतदार सामने होतात. अशा सामन्यांमुळे आयपीएल आणखी स्पेशल बनते. सामना जिंकला आहे, असं तुम्ही आधीच ठरवू शकत नाही.”